प्रसिध्द ज्वेलर्सचा गोळी झाडून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न


पुणे- पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यवसायिक व मराठे ज्वेलर्सचे मालक मिलिंद ऊर्फ बळवंत (वय ६०) यांनी त्यांच्या लक्ष्मीरोडवरील त्यांच्या दुकानात मंगळवारी संध्यकाळी छातीत गोळी झाडून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना  कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

 याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात  या घटनेची नोंद करण्यात आली आहे.  मिलिंद मराठे हे प्रसिद्ध सराफ व्यवसायिक आहेत. लक्ष्मी रोडवरील दुकानात ते असताना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ऑफिसमधून अचानक आवाज आला. तो आवाज ऐकून दुकानातील कर्मचारी तिकडे धावले. तेव्हा मराठे यांच्या छातीत गोळी लागली असल्याचे त्यांनी पाहिले कर्मचार्‍यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़ मराठे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. विश्रामबाग पोलीस अधिक तपास करीत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक