युवक कॉंग्रेसचे माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर आंदोलन

राजकारण
Spread the love

पुणे केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात विविध शेतकरी संघटना गेल्या 15 दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करत आहेत. शेतक -यांकडून होत असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविताना पुणे शहर युवा कॉंग्रेसच्या वतीने माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर आंदोलन केले. यावेळी युवा कॉंग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि शेतकरी कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली.


या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी केले असून युवा शहर अध्यक्ष विशाल मालके, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, उपाध्यक्ष सौरभ अमराळे यांच्यासहित सुमित नवले, इंद्रजित साळुंखे, निखिल कविश्वर, प्रताप काळे, हृषिकेश साठे, अभिजित रोकडे, कुणाल काळे, प्रताप शिलीमकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळी ११. 3० च्या सुमारास पुणे युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर जमले आणि तेथे बसून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. सोमवारी पुण्यात पाऊस पडला, परंतु या पावसात ही कामगार तिथेच बसून घोषणाबाजी करत राहिले. तब्बल एक तासानंतर कोथरूड पोलिस येथे आले आणि सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *