कॅरम इतका चुकीचा फुटला आहे की, कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात तेच कळत नाही.. का म्हणाले असे राज ठाकरे?


पुणे- महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) जे सुरू आहे ते अत्यंत किळसवाणं आहे. हा मतदारांचा घोर अपमान आहे. या सर्व गोष्टींची महाराष्ट्रात शरद पवार (Sharad pawar) यांनी सुरुवात केली. सुरुवातही त्यांनीच केली आणि शेवटही पवारांकडेच झाला, अशी प्रतिक्रिया मनसेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakaray) यांनी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना केली. दरम्यान, घड्याळाने काटा काढला की, काट्याने घडयाळ काढले हे मला माहिती नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली. (Mahrashtra Politics Crisis)

राज ठाकरे म्हणाले, तुम्ही महाराष्ट्रामध्ये जनमताचा कानोसा घेतला तर प्रत्येक घरात तुम्हाला शिव्या ऐकायला मिळतील. हा मतदारांचा घोर अपमान आहे. या सर्व गोष्टींची महाराष्ट्रात शरद पवार यांनी १९७८ साली पुलोदचा प्रयोग करून केली. त्यापूर्वी महाराष्ट्रात असं काही घडलं नव्हतं. त्यामुळे या गोष्टींची महाराष्ट्रात सुरुवात पवारांनीच केली आणि शेवटही पवारांकडेच झाला.

अधिक वाचा  विनायक मेटे यांनी बोलावलेल्या बैठकीवर मराठा क्रांती मोर्चाचा बहिष्कार:मराठा नेत्यांमध्ये मतमतांतरे

बहुदा हे पवारांनीच पेरलं असावं

प्रफुल्ल पटेल, (Prafulla Patel) दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil), छगन भुजबळ(Chagan Bhujbl) हे अजित पवारांबरोबर जाण्यासारखे नाहीत. ते अजित पवारांबरोबार जाऊन मंत्रिपद स्वीकारतील आणि वेगळ्या गोष्टी करतील असे मला वाटत नाही. अजित पवारांनीही परवा सर्व होर्डींगवर शरद पवारांचा फोटो लावा असे सांगितले. त्यामुळे हे सर्व अनाकलनीय आहे. मी परवा म्हटल्याप्रमाणे उद्या सुप्रिया सुळे(Supriya Sule) केंद्रीय मंत्री झाल्या तर आश्चर्य वाटायला नको. ही गोष्ट काही अचानक घडली असे नाही. गेले कित्येक दिवस वातावरणामध्ये ती चालू होती आणि काल ती दिसली त्यामुळे बहुदा हे पवारांनीच पेरलं असावं असेही राज ठाकरे म्हणाले.

कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात तेच कळत नाही

अधिक वाचा  मल्टिमोडल हबमुळे स्वारगेट चौकाचा कायापालट होणार

कॅरम इतका चुकीचा फुटला आहे की, कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात तेच कळत नाही, अशी मिश्किल टिप्पणीही राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केली. मी आमच्या लोकांना कालच म्हणालो की तुम्हीच फक्त आहात की तुम्ही मनसेचे आहात. बाकी कोण कुठल्या पक्षात आहेत हेच कळत नाही. मात्र, महाराष्ट्राची ही दुर्दैवी परिस्थिति आहे, महाराष्ट्रात असं कधीच झालं नव्हतं असे ठाकरे म्हणाले.

दरम्यान, सोमवारी मुंबईत झालेल्या मनसेचा बैठकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी कुठलीही मागणी कोणी केली नाही असे स्पष्ट करताना या सर्व गोष्टी तुम्ही बोलायला लागला तर ते या लोकांना हवचं आहे. निदान पत्रकारांनी तरी काही गोष्टीवर ठाम राहणं गरजेचे आहे असे ते म्हणाले.

अधिक वाचा  अजित पवार म्हणतात...वाईन आणि दारू यात जमीन-अस्मानाचा फरक

Raj Thackeray | Sharad Pawar |Mahrashtra Politics Crisis |

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love