If I sit on a horse, some people get stomach ache

ईडी, सीबीआय आणि स्वार्थाचा पाऊस पडला की निष्ठेचा चिखल होतो : कोणाला म्हणाले अमोल कोल्हे असं?

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे- ईडी, सीबीआय आणि स्वार्थाचा पाऊस पडला की निष्ठेचा चिखल होतो. हे चित्र सध्या राज्यात बघायला मिळत आहे. रविवारी जे घडलं ते पहिल्यांदा घडलं नाही. वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात घडलं. त्यापूर्वी मध्यप्रदेशात आणि त्याआधी कर्नाटकात घडलं. हे का घडतं?, याचं उत्तर मिळालं नाही. मात्र सगळं बंड घडल्यामुळे रडत बसणारे आम्ही नाही. हे का घडलं?, याचा विचार करायला हवा, असे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, ‘आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं नाही तर या महाभागांना पांडुरंग समजलाच नाही. मनापासून विठ्ठलाची निस्सिम भक्ती केली असती तर पांडुरंग पावला असता, असा पलटवार त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर केला.

अजित पवारांच्या सभेत छगन भुजबळांनी आमचा विठ्ठल बडव्यांनी घेरला असं वक्तव्य केलं.  त्यावर अमोल कोल्हेंनी पलटवार केला आहे.

अमोल कोल्हे म्हणाले की, ‘वाट सोडायला दोन कारणं असतात. शॉर्टकट पोहचू याचं आमिष असतं नाही तर पुढे जाऊन पकडले जाऊ याची भिती असते. आमिष आणि धोका हे सोडून जे या वाटेवर कायम राहतात, त्यांच्या पाठिमागे तत्वांची आणि नैतिकतेची बैठक असते. ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. अशाच प्रकारे जर पक्ष फोडले गेले तर नैतिकता कुठे गेली आणि मतदारांच्या मतांचं काय, असा प्रश्नदेखील कोल्हेंनी उपस्थित केला आहे.

 ‘कुरुक्षेत्रातल्या अर्जुनासारखी अनेकांची अवस्था झाली असेल. मात्र तिथेही जेव्हा य़ुद्ध निर्माण झालं. तेव्हा रथ दोन्ही पक्षांच्या मधोमध घेऊन जा असं सांगितलं होतं. कृष्णाने रथ मधोमध नेला अर्जुनाने दोन्हीकडे पाहिलं. तेव्हा समोर अनेक गुरुस्थानी असलेली माणसं होती तर एकीकडे रक्ताची नाती होती. त्यावेळी भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की ही लढाई कर्तव्याची आहे आणि नितीची आहे. त्यासोबतच ही लढाई धर्माची आणि अधर्माची आहे. उद्या जर लोकशाही टिकवायची असेल तर शरद पवारांच्या पाठिशी उभं राहणं हे माझ्या सारख्या प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं ते म्हणाले. 

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *