Kothrudkar will give a lead of 2 lakhs to Mohol?

मुरलीधर मोहोळ यांचा लोकसभेचा मार्ग मोकळा झाल्याच्या चर्चेला उधाण

पुणे-मुंबई राजकारण
Spread the love

पुणे :राज्यसभेसाठी भाजपने महाराष्ट्रातून कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना संधी दिली आणि पुणे लोकसभेचे संपूर्ण गणितच बदलल्याची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुकांनी विविध भव्यदिव्य कार्यक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क सुरू केला आहे. भाजपने मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन राजकीय अंदाज वर्तवणाऱ्या चाणकयांना धक्का देत पक्ष पातळीवरची अनेक गणिते सोपी केली आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला जनतेतला परिचित चेहरा म्हणून ओळख असलेल्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचा मार्ग मोकळा झाल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

वर्षभरापूर्वी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. या पराभवाला ब्राह्मण समाज नाराज असल्याची देखील एक किनार होती. त्यामुळे आता कोणत्याही निवडणुकीला ब्राह्मण समाजाला गृहीत धरणे भाजपसाठी अवघड बनल्याच दिसून आल. यामध्ये भर म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासून कोथरूडच्या आमदार राहिलेल्या मेधा कुलकर्णी यांना सतत डावलले जात असल्याचा आरोप केला जात होता. त्यामुळे आता लोकसभेला तरी त्यांच्या रूपाने भाजपा ब्राह्मण उमेदवार देईल, असे आडाखे बांधले जात होते. मात्र कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी देत भाजपने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर आता चर्चा आहे ती लोकसभेला संधी कोणाला?

सुरुवातीपासून लोकसभेच्या रेस मध्ये माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीस असणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांचे नाव आघाडीवर आहे. तर वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक हे देखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत. परंतु काही महिन्यांपूर्वीच पुण्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुळीक यांना आपल्या वडगावशेरी मतदारसंघात लक्ष देण्याचा सल्ला जाहीर स्टेजवर दिला होता. दुसरीकडे भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी देखील मैदानात उडी घेत अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून जनसंपर्काला सुरुवात केली आहे. त्यांनीही लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, एकूण जातीय गणिते पाहता राज्यसभेवर मेधा कुलकर्णी यांची वर्णी लागल्याने आता देवधर यांना संधी मिळणे अवघड आहे.   

दरम्यान, माजी माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी भव्यदिव्य कार्यक्रमांचे शहरात आयोजन करून वातावरण निर्मिती केली असली तरी मुळीक यांना प्रदेशाध्यक्षांनी विधानसभा मतदारसंघात लक्ष देण्याचा दिलेला सल्ला तसेच काल मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेचे उमेदवारी देत ब्राह्मण समाजाला दिलेले प्रतिनिधित्व. यामुळे आता संपूर्ण पुणे शहरात ओळखीचा चेहरा असणारे आणि महापौर असताना कोरोना काळामध्ये केलेल्या कार्यामुळे पुणेकरांच्या घराघरात पोहचलेले मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात लोकसभा उमेदवारीची माळ पडण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसत आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *