आमच्यासाठी शरद पवार श्रीकृष्ण तर अजितदादा अर्जुन : आमचा मात्र …. झाला आहे : या आहेत राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे- अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादीचे(ncp) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.आम्हा कार्यकर्त्यांची अवस्था अभिमन्यू सारखी झाली आहे, अशा भावना राष्ट्रवादीचे पदाधिकारीच व्यक्त करू लागले आहेत. (The condition of our workers became like Abhimanyu)

दोन दिवसांपूर्वी अचानक राज्यात राजकीय भूकंप ( A political earthquake) होऊन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या नऊ शिलेदारांसह शिंदे- फडणवीस सरकार (Shinde- Fadanvis Govt.) ती त्यावर या शपथविधीने शिक्कामोर्तब केले. यावरून राष्ट्रवादीमध्ये फुट पडली आहे. एकीकडे साहेब आणि सुप्रियाताई तर दुसरीकडे अजितदादा. काका-पुतण्या, भाऊ- बहीण कधी एकत्र येतील सांगता येत नाही. त्यामुळे आपण कोणामागे जायचे या विचाराने पक्ष संघटनेच्या स्तरावर कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची अवस्था बिकट झाली आहे.  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांची पुतणे अजित पवार असे दोन गट राष्ट्रवादीचे पडले आहेत त्यामुळे पदाधिकाऱ्यांशी संभ्रावस्था अधिक वाढली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली याबाबतचा विचार विनिमय करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला तेरा तालुक्यांपैकी आठ तालुक्यांचे अध्यक्ष उपस्थित होते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.  पाच तालुकाध्यक्ष त्यांच्या स्थानिक ठिकाणी एकूण पक्षातील घडामोडींवर लक्ष ठेवून असून त्याबाबतच्या बैठकांमध्ये व्यस्त असल्यामुळे ते आजच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही असे सांगण्यात आले. दरम्यान, आजची बैठक पार पडली तरी आपण कोणाबरोबर जायचे याचा मात्र निर्णय या बैठकीत होऊ शकला नाही.

उद्या (बुधवारी) मुंबईमध्ये शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही बैठक बोलावलेली आहे आता या पैकी नक्की कुठल्या बैठकीला उपस्थित राहायचे अशी संभ्रावस्था कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची झाली आहे.

आमच्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) हे श्रीकृष्ण (shrikrishna) आहेत तर अजित दादा अर्जुन (Arjun) आहेत. मात्र, आमच्या कार्यकर्त्यांचा अभिमन्यू झाला आहे अशा भावना जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर (Pradeep Garatkar)यांनी व्यक्त केल्या आहेत.

The condition of our workers became like Abhimanyu | Ajit Pawar | अजित पवार बंड |Sharad Pawar | ncp

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *