धिरेंद्र शास्त्रीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा : सोनाली मारणे


पुणे–संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांविषयी बदनामीकारक आणि धादांत खोटारडे वक्तव्य करणाऱ्या धिरेंद्र शास्त्री विरोधात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, पुणे शहर काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या वतीने राणी लक्ष्मीबाई चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव सोनाली मारणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात धिरेंद्र शास्त्रीच्या फोटोला  उपस्थित महिलांनी चप्पल मारून संताप व्यक्त केला. महाराष्ट्र सरकारणे पुढाकार घेऊन महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या तुकाराम महाराजांची बदनामी करणाऱ्या धिरेंद्र शास्त्रीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोनाली मारणे यांनी केली.

संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी जिजाऊ यांच्यात विठ्ठल भक्तीवरून कोणतेही मतभेद नव्हते, नामस्मरण आणि अभंग लेखनात जिजाऊ या तुकोबांच्या अर्धांगिनीचा कोणताही अडथळा नव्हता. असं असताना नाहक तुकोबाराय आणि त्यांच्या अर्धांगिनी यांच्याबद्दल विखार पसरवनाऱ्या धिरेंद्र शास्त्रीचे डोके ठिकाणावर आहॆ कां, असा सवाल मारणे यांनी उपस्थित करून तुकोबानी भोंदू बाबापासून लोकांनी दूर रहावं अशीच शिकवण तुकाराम महाराजांनी दिली, यामुळेच मंबाजीचे आजचे वारस धिरेंद्र शास्त्री सारखे त्यांच्या विरोधात गरळ ओकत आहेत. महाराष्ट्र सरकारणे पुढाकार घेऊन महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या तुकाराम महाराजांची बदनामी करणाऱ्या धिरेंद्र शास्त्रीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोनाली मारणे यांनी केली.

अधिक वाचा  ज्या पायऱ्यांवर धक्काबुक्की झाली होती त्याच पायऱ्यांवर केला सोमय्यांचा सत्कार : जोरदार घोषणाबाजी करत भाजपचे शक्तिप्रदर्शन

यावेळी माजी महापौर कमलताई व्यवहारे, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल शिरसाठ, सेवा दल अध्यक्ष प्रकाश पवार, वाल्मिक जगताप, विकास देशपांडे, द. स. पोळेकर, बाणखेले, नाना करपे, संदीप मोरे, किशोर मारणे, संतोष पाटोळे, संदीप ताम्हणकर, राजू ठोंबरे, वाहिद निलगर, अक्षय माने, सद्दाम शेख, सचिन भोसले, गौरव बालंडे, रविदादा रनसिंग, रवि देशमुख, नलिनी दोरगे, अमीना शेख,  राजश्री अडसूळ, ज्योती अरवेन, जया गांगुर्डे, शर्वरी गोतारणे, रजिया बल्लारी, चंदा कांबळे, छाया जाधव, लता घडसिंग, कांचनबाल नायक, माया डूरे, मनीषा गायकवाड, अश्विनी गवारे, स्वाती गवते,  जया गांगुर्डे,  विजय मोहिते, अजित जाधव,  राहुल वंजारी, राज गेहलोत, सुधीर काळे, गुलाम हुसेन, अर्जुन लोणंद कर, लता  पवार, रंजना राजपूत, सुनीता शिंदे, मंगला संसारे, सुनीता पेंदूरकर, कल्पना कदम, राजू सकट, शंकर वाणी  मिना कदम, आरती भांबुरे, ज्ञानेश्वर काळे, स्वप्नील वाडेकर, महेंद्र तिडके, राजू पाडळे, स्वाती गवते, रेश्मा सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्तिथ होते.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love