Modi should take action against ministers who make dirty speeches

अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान -सुप्रिया सुळे

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे- संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळय़ात पालकमंत्री अजित पवार यांना बोलण्याची परवानगी देण्यात आली नाही. पंतप्रधान कार्यालयाकडूनच ही परवानगी नाकारली गेली असून, हा महाराष्ट्राचा अवमान असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी अमरावती येथे बोलताना व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज मंदिराचा लोकार्पण सोहळा मंगळवारी पार पडला. या सोहळय़ात मोदी यांच्यापूर्वी बोलण्याचा मान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला. मात्र, दुसरीकडे अजित पवार हे पुणे जिल्हय़ाचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री असतानाहि त्यांना बोलण्यास परवानगी देण्यात आली नाहि. त्यामुळे वाद निर्माण झालेला असताना सुप्रियाताई यांनी त्यावर परखड भाष्य केले.

 अमरावती याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, आमच्या नेत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अजित दादा व महाराष्ट्राचा आवाज दाबणार्‍या या मोदी सरकारचा आम्ही निषेध करतो. मिनिट टू मिनिट प्रोग्राममध्ये प्रोटोकॉलसाठी अजित पवार यांचे भाषण व्हावे म्हणून महाराष्ट्र सरकारने पीएमओला विनंती केली होती. पण, ती विनंती त्यांनी ग्राह्य धरली नाहि. हा महाविकास आघाडीवर अन्याय आहे. आमच्या राज्यातील आमचा नेता व्यासपीठावर आहे. तुम्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांना भाषण करण्याची संधी देता. पण आमच्या नेत्याला भाषण करू देत नाहि. हि दडपशाहि आहे. आमच्या नेत्याचा आवाज दाबण्याचे काम होणे, हे दुर्दैवी आहे. प्रोटोकॉलप्रमाणे आमच्या नेत्याला भाषण करण्याची संधी द्यायला हवी होती, अशी नाराजी सुप्रियाताईंनी व्यक्त केली.

 पालकमंत्र्यांना संधी न मिळाल्याने आश्चर्य

दरम्यान, या कार्यक्रमात मोदी यांच्यापूर्वी फडणवीस यांना भाषणाची संधी मिळाली. फडणवीस यांच्यानंतर अजित पवार बोलतील, अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. मात्र, त्यानंतर मोदी भाषणास उभे राहिले. पालकमंत्री उपस्थित असतानाही त्यांना बोलण्याची परवानगी मिळाली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले.  याबाबत अनेकांनी नाराजीहि बोलून दाखवली. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी यात उडी घेतल्याने यावरून वाद निर्माण झाल्याचे चित्र तयार झाले आहे.

म महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळय़ात पालकमंत्री अजित पवार यांना बोलण्याची परवानगी देण्यात आली नाही. पंतप्रधान कार्यालयाकडूनच ही परवानगी नाकारली गेली असून, हा महाराष्ट्राचा अवमान असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी अमरावती येथे बोलताना व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज मंदिराचा लोकार्पण सोहळा मंगळवारी पार पडला. या सोहळय़ात मोदी यांच्यापूर्वी बोलण्याचा मान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला. मात्र, दुसरीकडे अजित पवार हे पुणे जिल्हय़ाचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री असतानाहि त्यांना बोलण्यास परवानगी देण्यात आली नाहि. त्यामुळे वाद निर्माण झालेला असताना सुप्रियाताई यांनी त्यावर परखड भाष्य केले.

 अमरावती याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, आमच्या नेत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अजित दादा व महाराष्ट्राचा आवाज दाबणार्‍या या मोदी सरकारचा आम्ही निषेध करतो. मिनिट टू मिनिट प्रोग्राममध्ये प्रोटोकॉलसाठी अजित पवार यांचे भाषण व्हावे म्हणून महाराष्ट्र सरकारने पीएमओला विनंती केली होती. पण, ती विनंती त्यांनी ग्राह्य धरली नाहि. हा महाविकास आघाडीवर अन्याय आहे. आमच्या राज्यातील आमचा नेता व्यासपीठावर आहे. तुम्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांना भाषण करण्याची संधी देता. पण आमच्या नेत्याला भाषण करू देत नाहि. हि दडपशाहि आहे. आमच्या नेत्याचा आवाज दाबण्याचे काम होणे, हे दुर्दैवी आहे. प्रोटोकॉलप्रमाणे आमच्या नेत्याला भाषण करण्याची संधी द्यायला हवी होती, अशी नाराजी सुप्रियाताईंनी व्यक्त केली.

 पालकमंत्र्यांना संधी न मिळाल्याने आश्चर्य

दरम्यान, या कार्यक्रमात मोदी यांच्यापूर्वी फडणवीस यांना भाषणाची संधी मिळाली. फडणवीस यांच्यानंतर अजित पवार बोलतील, अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. मात्र, त्यानंतर मोदी भाषणास उभे राहिले. पालकमंत्री उपस्थित असतानाही त्यांना बोलण्याची परवानगी मिळाली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले.  याबाबत अनेकांनी नाराजीहि बोलून दाखवली. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी यात उडी घेतल्याने यावरून वाद निर्माण झाल्याचे चित्र तयार झाले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *