‘शिंदे- फडणवीस’ सरकार हे “फसवणीस सरकार” असल्याचेच पुन्हा सिद्ध – गोपाळदादा तिवारी : वीज दरवाढीचा केला धिक्कार

‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा

पुणे – विधानसभेत ऊपमुख्यमंत्री, राज्याचे अर्थ व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वीज दरवाढीचा भार जनतेवर पडु देणार नाही’ असे तब्बल २ वेळा सांगुन देखील तीन आठवड्यांच्या आतच न्यायप्रविष्ट व असंवैधानिक सरकार असलेल्या ‘शिंदे- फडणवीस’ सरकारने हे  सरकार अखेर “फसवणीस सरकार” असल्याचेच पुन्हा सिद्ध केले आहे असा आरोप  काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला आहे.

अडाणी पॅावरची ‘चौकशी प्रलंबित देणी’ मध्ये, ‘लोहार कोल ब्लॅाक’चा कोळसा न वापरता ही १०,५०० कोटीचे गैरलागु देण्यासह २०१४ ते १८ ची ‘वादग्रस्त थकबाकी’ देण्यासाठी राज्यातील जनतेवर २२ % ची वीज दरवाढ लादणाऱ्या राज्य सरकारचा गोपाळदादा तिवारी यांनी तीव्र धिकाःर केला  व अजुनही २०१८ नंतर ची अडाणी पॉवर’ची थकबाकी देणी तर वेगळीच असल्याचे सांगीतले.    

अधिक वाचा  सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं-सचिन पायलट

शहर काँग्रेस तर्फे वीज दरवाढ विरोधी आंदोलन रास्तापेठ पॅावर हाऊस बाहेर करण्यात आले. २०१४-१९ मध्ये सवंग लोकप्रियतेच्या नादात २०१४ अखेर वीज ग्राहकांकडे असलेली सु १४,००० कोटींची थकबाकी, तब्बल ५ वर्षे वसुल न केल्यामुळे ती मविआ सरकार सत्तेवर आली तेंव्हा ५०,००० कोटींचे वर गेल्याचे पहायला मिळाले.. त्यामुळे त्याचे भरमसाठ व्याजाचा बोजा देखील राज्यसरकार च्या डोक्यावर आल्याचे त्यांनी सांगीतले.

या जाचक व द्वीवर्षीय (२३-२४ व २४-२५)च्या नियोजित  दरवाढीमुळे ‘अदाणी पॅावरला’ फायदा होईल तसेच राज्यात ही ऊद्योगधंदे येणार नाहीत, आहेत ते सु ३०-४० % महाग वीजे मुळे डबघाईला आले असुन गुजरातला महाराष्ट्रा पेक्षा ४० % वीजदर स्वस्त असल्याने ते तिकडे जाण्याचा धोका संभवत असल्याचे सांगुन, दुद्गैवाने राज्यातील न्यायप्रविष्ट, महाराष्ट्रद्रोही ईडी सरकार महाराष्ट्राच्या हिताकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.

अधिक वाचा  मी पुन्हा आलो आहे, एकनाथ शिंदेंना बरोबर घेऊन आलो आहे : होय हे 'ईडी'चे सरकार आहे - देवेंद्र फडणवीस

‘महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगा’(MERC)कडे, राज्यातील जनतेने विज दरवाढ विरोधी सु १०,००० हुन अघिक हरकती नोंदवल्या असुन, विज ग्राहक संघटनेने देखील तीव्र हरकत नोंदवली आहे. या मध्ये ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वतीने देखील आपण स्वतः हरकत नोंदवली असल्याचे’ काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले..! परंतु हरकतींच्या सुनीवणीस देखील बोलावले नसल्याचे त्यांनी सांगितले.

मोदी शहांच्या दबावामुळे ‘अडानींची आर्थिक परिस्थिती सुधरवण्यासाठीचे’ सर्व प्रयत्न ‘भाजप अंकीत राज्य सरकारे’ करीत असुन ‘शिंदे_फडणवीसांचा’चा शपथविधी झाल्या बरोबर लगेचच (दोघांच्याच् मंत्री मंडळाने) अडानी पॅावरचे सु. ७,००० कोटींचे देणे देण्याचा ‘सर्वप्रथम निर्णय’ घेतला हे देखील सत्तेवर येण्याचा ईडी सरकारचा हेतू स्पष्ट करतो, असा संतप्त आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love