पुण्यात लसीचा दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये करोनाची बाधा होण्याचं प्रमाण वाढले

महाराष्ट्र
Spread the love

पुणे— पुण्यात करोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीचा दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये करोनाची बाधा होण्याचं प्रमाण वाढले असल्याचे निदर्शनास आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुण्यात दुसऱ्या डोसनंतर करोनाची बाधा होण्याचं प्रमाण हे पहिल्या डोसनंतर करोनाची बाधा होण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याचं अजित पवार यांनी यावेळी नमूद केलं “पुणे शहरात करोनाबाधित होण्याचा दर २.१ टक्के, पिंपरी-चिंचवडमध्ये २.२ टक्के आणि पुणे ग्रामीणमध्ये ३.८ टक्के आहे. गेल्या आठवड्यापेक्षा परिस्थिती सुधारली आहे. मृत्यूदर देखील काहीसा कमी झाला आहे. गेल्या आठवड्यात ५ लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. लसीकरणात ५ टक्के वाढ झाली आहे. पहिला डोस घेतल्यानंतर किती लोकांना बाधा होतेय, याचा सर्वे केल्यानंतर त्यात ०.१९ टक्के लोकांना बाधा होत असल्याचं लक्षात आलं आणि दुसरा डोस घेतल्यानंतर हे प्रमाण ०.२५ टक्के इतकं आहे”, असं अजित पवार म्हणाले. पुण्यात गेल्या १५ दिवसांत रोजच्या रुग्णांमध्ये ३० टक्के आणि अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये १९ टक्के घट दिसून आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, दुसऱ्या डोसनंतर देखील करोनाची लागण होण्याचं प्रमाण जास्त का आहे, याविषयी अजित पवार म्हणाले, “हे प्रमाण जास्त का याविषयी आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की दुसरा डोस झाल्यानंतर लोक नियम फारसे पाळत नाहीत. मास्क न घालणं, इतर नियमावलीचं पालन न करणं हे घडत आहे. त्यामुळे जरी आपण टप्प्याटप्प्याने शिथिलता आणत असलो, तरी नागरिकांनी मास्क वापरलेच पाहिजेत. सामाजिक अंतर पाळलंच पाहिजे. स्वत:सोबत आपल्या परिवाराचीही काळजी घ्यायला हवी”, असं आवाहन यावेळी अजित पवार यांनी केलं.

पुण्यात सलग ७५ तास लसीकरण!

पुणे शहर आणि ग्रामीणमध्ये सलग ७५ तास लसीकरण केलं जाणार असल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितलं. “पुण्यात सलग ३ दिवस आणि पुढे तीन तास असे सलग ७५ तास शहर आणि ग्रामीण भागात लसीकरणाचा कार्यक्रम घेतला जाईल”, असं ते म्हणाले. “ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्यात एक कोविड आणि इतर नॉन कोविड रुग्णालयं सुरू करावीत असं सांगितलं आहे. शाळांमधून कोविडबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून मुलं त्यासंदर्भातली काळजी घेतील”, असं देखील अजित पवार म्हणाले.

गेल्या आठवडय़ात 5 लाख लोकांचे लसीकरण

पुण्यात मागील आठवडय़ात 5 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. दुसऱया डोस घेतल्यानंतर नियम पाळले जात नसल्यामुळे कोरोनाबधित वाढत आहेत. नागरिकांनी मास्क वापरले पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग पाळले पाहिजेत. पुण्यातील सक्रिय रुग्णांमध्ये 19 टक्के घट झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

अहमदनगर जिह्यातील कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक

राज्यातील करोना परिस्थीती आटोक्यात येत असताना अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. नगरमध्ये गावबंदी करायची असेल तरी करा, असे सांगतानाच नगरमध्ये रुग्ण नेमके कुठले आहेत ते तपासण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

पुण्यात कोरोंना आढावा बैठकीत ते बोलत होते.

पुण्यातील ससून रुग्णालयात सर्वाधिक रूग्ण नगरचे आहेत. नगरचे जवळपास 40 टक्के रुग्ण आहेत. यात संगमनेर आणि पारनेर या दोन तालुक्यातील  सर्वाधिक रूग्ण आहेत. याबाबत नाशिक आणि नगर येथील प्रशासकीय अधिकाऱयांसोबत चर्चा केली. त्यावेळी रूग्णांवर उपचार करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत. अधिकाऱयांना चाचण्यांसाठी मदत हवी होती. नगर जिह्यात संगमनेर, पारनेरमध्ये रुग्णसंख्या वाढतेय. तिथे कठोर निर्बंध लागू करा आणि कोरोनाचा संसर्ग रोखा, असेही पवार यांनी यावेळी नमूद केले.

मी कधीच दोनचा प्रभाग मागितला नाही.

महापालिका निवडणुकीसाठी मी कधीच दोनचा प्रभाग मागितला नाही. आता आम्ही तीन प्रभाग फायनल केले आहेत आणि हा निर्णय कायम राहणार अजित पवार यांनी स्पष्ट केले. तीन प्रभागांचा नेमका कोणाला फायदा होतो ते पाहू असे सूचक विधानही त्यांनी केले. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करायची की नाही याचा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहूनच घेतला जावा असे आपले मत असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या बैटकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मंत्री फिरकले नाहीत हा विरोधकांचा आरोप खोटा

मराठवाडय़ात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे, हे खरे आहे पण अजून निर्णय झालेला नाही. जलयुक्त शिवार  योजनेमुळेच एवढा पूर आलाय का? अशी शंका तज्ञांनी उपस्थित केली आहे हे खरे आहे.  त्याचाही अभ्यास करू. नुकसान भरपाई देण्याबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ, असंही अजित पवार म्हणाले. मोठा भाग पूरग्रस्त बनलाय, पीकविमा संबंधित विमा कंपन्यांना सूचना दिल्यात आहेत. पाऊस पडत होता तेव्हा मंत्री मराठवाडय़ातच होते. मंत्री फिरकले नाहीत हा विरोधकांचा आरोप खोटा असल्याचेही पवार यांनी सांगितले.

मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिकता नाही

राज्यात आता 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु होत आहेत.शाळांमधून कोविड प्रोटोकॉल सांगण्यात यावा. शाळा 4 तारखेपासून सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, पालक अजून आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिकता दिसत नाही, दिवळींनंतर पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *