राहुल गांधींना ईडीने पुन्हा चौकशीसाठी बोलावल्याच्या निषेधार्थ कॉँग्रेसचे आंदोलन

राजकारण
Spread the love

पुणे–नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी ईडीने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना आज पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. यांच्या निषेधार्थ आज पुण्यात काँग्रेस आक्रमक होत बालगंधर्व रंगमंदिराबाहेर टायर पेटवत आंदोलन केले.

दरम्यान, यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनाचे नेतृत्व पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले. या आंदोलनाला पुणे शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष रमेश बागवे, संगीता तिवारी, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक अभय छाजेड, नगरसेवक अविनाश बागवे, व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना समन्स जारी केला होता. १३ जून रोजी दिल्ली ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले होते. १३ जून आणि १४ जून रोजी चौकशी केल्यानंतर आज पुन्हा राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. याच्या निषेधार्थ आज काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात येत आले.

अरविंद शिंदे म्हणाले, आमच्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांना ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी बोलवले आहे. मोदी सरकार आमच्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यावर मुद्दाम ईड ची कारवाई करत आहे. या मोदी सरकारला सर्व राज्यांत व देशात फक्त त्यांची सत्ता पाहिजे आहे. म्हणून मुद्दाम हे कारस्थान सुरू आहे. राहुल गांधी यांची काही चूक नसताना त्यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले. आम्ही या घटनेचा निषेध करत आहोत मोदी सरकारने राहुल गांधी यांची या प्रकारांचा सुटका करावी. अशी आम्ही मागणी या आंदोलनातून करत आहोत. असे अरविंद शिंदे म्हणाले.

आज देशातील लोकशाही नष्ट करण्याचा काम हे भाजप करत आहे. राहुल गांधी यांच्यावर विनाकारण ईडी चौकशी लावून ज्या नॅशनल हेराल्ड प्रकरणात काहीही घोटाळा झालेला नसताना ही राहुल गांधी यांना बदनाम करण्याचा काम हे भाजप सरकार करत आहे. देशात हिटलरशाही सुरू असून संविधान नष्ट करण्याचा काम हे मोदी सरकार करत असल्याची टीका यावेळी आंदोलकांनी केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *