gtag('js', new Date());
पुणे--श्रीगणेशा पाळणा हलके हलके जोजवा... पाळण्याचा मधोमध याला ग निजवा... अशा मंगल स्वरांत पाळणा म्हणत पारंपरिक वेशातील महिलांनी गणरायाची मनोभावे प्रार्थना केली. स्वस्तिक, ओम यांसारखी शुभचिन्हे आणि गजमुखाच्या नक्षींनी सजलेल्या सुवर्णपाळण्यात यंदा श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात श्री गणेश जन्म सोहळा दुपारी १२ वाजता शेकडो गणेशभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.श्रीमंत दगडूशेठ...
मराठा समाजाला कुणबी ओबीसीमधून आरक्षण द्यावे की नाही? हे सांगा : चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना आव्हान
पुणे--चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबात पोटनिवडणुकीची उमेदवारी देण्यासाठी कोणाचेही दुमत नाही. इच्छुकांची नावे प्रदेशकडे पाठविली जातील. प्रदेशची कमिटी नाव निश्चित करेल आणि दिल्लीतून उमेदवाराचे नाव जाहीर होईल, सांगत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चिंचवडची उमेदवारी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत दिले. दरम्यान, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अजितदादांपासून उद्धवजींची भेट घेणार...
पुणे- भीमा नदीपात्रात ६ दिवसांमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह आढळले होते. या सात जणांनी सामुहिक आत्महत्या केल्याचे म्हटले जात असतानाच आता त्याला वेगळे वळण मिळाले असून त्यांच्या चुलत भावानेच त्यांचा खून करुन मृतदेह नदीत फेकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यातील चार पुरुष तर एक महिला आरोपी आहे.
पुणे : पटियाला घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रबर्ती आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध शास्त्रीय राहुल देशपांडे यांच्या दमदार सहगायनाने 'वसंतोत्सव'चा आजचा पहिला दिवस रंगला.यावर्षी पुनीत बालन समूह प्रस्तुत आणि डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सद्वारे आयोजित करण्यात येणारा १६ वा ‘वसंतोत्सव’ म्हातोबा दरा, पेठकर...
पुणे : सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारताकरीता तरुणाईने पुढाकार घ्यावा तसेच युवा शक्तीला योग्य गती व दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचे अधिष्ठान निर्माण करण्याकरीता पुण्यामध्ये सहाव्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे शुक्रवार, दिनांक २७ व शनिवार, दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी संस्थेच्या सभागृहात ही संसद...
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
पुणे-पंतप्रधान पदावरील व्यक्तीने सतत ‘पक्षीय भुमिकेत राहणे, विकासाबाबत पक्षानुसार भेदभाव करणे या बाबी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पंतप्रधान पदाशी प्रतारणा करण्यासारख्या आहेत. असे वागणे देशाच्या प्रमुख घटनात्मक पदावरील व्यक्तिस अशोभनीय असल्याची टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली. पंतप्रधान मोदींच्या सरकारी खर्चातील, मुंबई - दौऱ्यास आक्षेप घेणे गरजेचे असून, मुंबई-दौरा खर्च, भाजप कडुन वसुल करण्याचे आदेश...