त्या सात जणांची सामुहिक आत्महत्या नव्हे तर हत्या

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- भीमा नदीपात्रात ६ दिवसांमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह आढळले होते. या सात जणांनी सामुहिक आत्महत्या केल्याचे म्हटले जात असतानाच आता त्याला वेगळे वळण मिळाले असून त्यांच्या चुलत भावानेच त्यांचा खून करुन मृतदेह नदीत फेकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यातील चार पुरुष तर एक महिला आरोपी आहे.

दौंड तालुक्यातील  पारगाव येथे भीमा नदीत सात जणांचे मृतदेह महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. पोलिसांना १८ ते २२ जानेवारी या पाच दिवसांत पारगाव हद्दीतील भीमा नदीपात्रात चार मृतदेह मिळून आले. यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. यानंतर केलेल्या शोधकार्यात तीन मुलांचे मृतदेह सापडले होते. याप्रकरणी अशोक पवार, श्याम पवार, शंकर पवार, प्रकाश पवार, कांताबाई जाधव, या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मोहन पवार, संगीता पवार, मुलगी राणी आणि जावई त्यांची मुलीची ३ मुले यांचे मृतदेह नदीत सापडले होते. १७  तारखेला हे कुटुंब नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोजमधून दौंड तालुक्यातील पारगाव येथे आल्याचे आणि त्यांनी  नदीत त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते.

पोलीस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले,  गंभीर प्रकार लक्षत घेता आम्ही अनेक पथक तयार केले होते. काही पुरावे समोर आले त्यातून घातपात करुन त्यांचा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे . पाचही आरोपी नातेवाईक असून ते एकाच गावातील रहिवासी आहेत. आरोपी अशोक पवार यांचा भाऊ धनंजय पवार यांचा अपघातात मृत्यू झाला होता आणि त्याला कारणीभूत हे पवार कुटुंब होतं. त्याचा राग मनात धरून ही हत्या करण्यात आली आहे. सगळे आरोपी हे एकमेकांचे भाऊ बहिणभाऊ आहेत.

मोहन पवार यांचा मुलगा तीन महिन्यांपूर्वी अनिल पवार आणि त्याचा चुलत भाऊ धनंजय पवार हे एकत्र त्यांच्या पेरणे फाटा इथे असलेल्या सासुरवाडीला गेले असता त्यांचा अपघात झाला होता. या अपघातात धनंजय पवार यांचा मृत्यू झाला. धनंजयचा मृत्यू हा अपघात नसून घातपात झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांना होता. मोहन पवार आणि कुटुंबीयांनी काळी जादू केली आणि त्यामुळेच धनंजयचा मृत्यू झाला असं त्याच्या कुटुंबाला वाटत होता. मात्र अंधश्रद्धेतून हत्याकांड झाला आहे, असं पोलिस तपासात अजूनही पुढे आलं नाही आहे. यासंदर्भात सगळे पथकं तपास करत असल्याचे गोयल यांनी सांगितले.

मोहन पवार हे यांचे चुलत भावाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. मोहन पवार यांचा मुलगाबरोबर असताना तीन ते चार महिन्यांपूर्वी चुलत भावाच्या मुलाला अपघात झाला होता. तो मुलगा हॉस्पिटलमध्ये असतानाही मोहन पवार व त्यांच्या मुलाने ही बाब त्यांना सांगितली नाही. ४ दिवसानंतर मुलाच्या अपघाताची माहिती चुलत भावाला मिळाली. त्यानंतर त्या मुलाचा मृत्यु झाला होता. या घटनेचा राग मनात धरुन चुलत भावाने या सर्वांची हत्या करुन त्यांचे मृतदेह नदीत फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे.

नदी पात्रात 7 मृतदेह सापडल्या नंतर पोलीसांनी चार जणांना संशयित ताब्यात घेतले. मोहन पवार, संगीता पवार, मुलगी राणी आणि जावई त्यांची मुलीची 3 मुले यांचे मृतदेह नदीत सापडले होते. 17 तारखेला हे कुटुंब नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोजमधून दौंड तालुक्यातील पारगाव येथील नदीत त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू हा बुडून झाला असल्याचे समोर आले होते. परंतु नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला होता.

पोलिसांना १८ ते २२ जानेवारी या पाच दिवसांत पारगाव हद्दीतील भीमा नदीपात्रात चार मृतदेह मिळून आले. यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. यानंतर केलेल्या शोधकार्यात तीन मुलांचे मृतदेह सापडले. या प्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून त्यांनी हत्या केल्याची कबुलीही दिली आहे. आरोपीच्या एका भावाचा काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. हा अपघात सदर कुटुंबियांनी अंधश्रद्धा आणि करणीच्या माध्यमातून केल्याचा आरोप आरोपींनी केला आहे. त्याच रागातून संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *