सशक्त राजकारण, सशक्त भारताकरीता सहावी ‘युवा संसद’ पुण्यात : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्, पुुणे तर्फे आयोजन

पुणे-मुंबई शिक्षण
Spread the love

पुणे : सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारताकरीता तरुणाईने पुढाकार घ्यावा तसेच युवा शक्तीला योग्य गती व दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचे अधिष्ठान निर्माण करण्याकरीता पुण्यामध्ये सहाव्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे शुक्रवार, दिनांक २७ व शनिवार, दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी संस्थेच्या सभागृहात ही संसद होणार आहे. यामध्ये देशभरातील राजकारण, समाजकारण आणि विविध विषयांतील तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी देशभरातील तरुणांना मिळणार आहे, अशी माहिती इन्स्टिटयूटस् उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संसदेकरीता देशभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून माजी खासदार राजू शेट्टी हे आयोजन समितीचे अध्यक्ष असणार आहेत. तर सुषमा अंधारे, राजेश पांडे, संजय आवटे, मेघराज भोसले, राहुल कराड, प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, अ‍ॅड.शार्दुल जाधवर हे कार्यकारणीमध्ये आहेत.

महाराष्ट्र व गोवा येथून सुमारे १५०० विद्यार्थी संसदेत सहभागी होणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, नेहरु युवा केंद्र, लायन्स क्लब आॅफ पुणे पर्ल यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी संसदेत सहभागी होणार आहेत. पुणे, सोलापूर, अकोला, कोल्हापूर, मराठवाडा, कोकण यांसह विविध भागांतून विद्यार्थी संसदेकरीता पुण्यामध्ये येणार आहेत.

अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा विविध विषयांवर संसदेत चर्चा होणार आहे. वयवर्षे १६ ते ४० मधील तरुणांनी संसदेत सहभाग घ्यावा. संसदेत सहभागी होण्याकरीता मोफत प्रवेश असून विद्यार्थीनींची एक दिवसाची पुण्यामध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात येणार आहे.

देशभरातील विद्यार्थ्यांनी संसदेतील सहभागाकरीता मो. ९०७५३४४२७६, ८६०५७६९९७० या क्रमांकावर संपर्क साधावा आणि https://forms.gle/JVxcoNARkwzrmMNLA या लिंकवरुन फॉर्म भरावा. त्यानुसार विद्यार्थ्यांची नोंदणी होणार आहे. संसदेच्या माध्यमातून युवकांनी राजकारण आणि समाजकारणातील दिग्गजांसोबत संवाद साधावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे. संसदेकरीता प्रवेश विनामूल्य आहे, तरी तरुणाईने मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *