Pull the BJP down from power, which gives royal recognition to corruption

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याचा खर्च भाजप कडुन वसुल करण्याचे आदेश निवडणुक आयोगाने द्यावेत, कारण…. गोपाळदादा तिवारी

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे-पंतप्रधान पदावरील व्यक्तीने सतत ‘पक्षीय भुमिकेत राहणे, विकासाबाबत पक्षानुसार भेदभाव करणे या बाबी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पंतप्रधान पदाशी प्रतारणा करण्यासारख्या आहेत. असे वागणे देशाच्या प्रमुख घटनात्मक पदावरील व्यक्तिस अशोभनीय असल्याची टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली. पंतप्रधान मोदींच्या सरकारी खर्चातील, मुंबई – दौऱ्यास आक्षेप घेणे गरजेचे असून, मुंबई-दौरा खर्च, भाजप कडुन वसुल करण्याचे आदेश निवडणुक आयोगाने द्यावेत, अशी मागणीही तिवारी यांनी केली आहे.

देशाचे प्रधानसेवक मोदीजी, हे “पंतप्रधान पदाच्या (कोणालाही फेवर न करता, विकासाच्या धोरणात सर्वांशी समान बुध्दीने काम करण्याच्या) शपथेचा” सतत भंग करीत असल्याचा आरोपही तिवारी यांनी केला आहे.  मोदीजी स्वतःस देशाचे प्रधानसेवक व चौकीदार म्हणवतात, मात्र ‘पंतप्रधान पदाच्या शपथेचा’ ते सतत भंग करीत, विकासात मात्र भाजप समर्थक भुमिका घेतात, जाहीर बोलतात हे त्यांचे वागणे असंवैधानिक आहे. केवळ निवडणुक काळातच नव्हे तर सतत सदा – सर्वकाळ पंतप्रधान ऐवजी ‘भाजपचे प्रधान प्रचारक’ म्हणूनच ते देशभर सरकारी खर्चाने वावरतात.

सरकारी खर्चाने होणाऱ्या ‘विकास प्रकल्पांच्या ऊदधाटन प्रसंगी’ देखील केवळ स्वपक्षाच्या प्रचाराचे ढोल बडवत.. “राज्यात व स्थानिक मनपात देखील स्वपक्ष भाजप’ची सत्ता आली तरच विकास होईल हे प्रत्यक्ष सांगणे, एक प्रकारे जनतेस धमकावणे आहे, असे गोपाळ तिवारी म्हणाले.

पुर्वीच्या सरकारांनी देशांतील घटनात्मक संघराज्य पध्दतीस अनुसरून प्लॅनिंग_कमिशन केले ते घटनेस धरूनच होते. पंच वार्षिक “योजना आयोग”द्वारे विकासांचा अनुशेष भरून निघत होता. केंद्रात वा राज्यात कोणत्याही पक्षाचे / विचारांचे सरकार असले तरीही विकास निधी मिळत होता.  

वास्तविक, २०१४ अखेर, देशात काँग्रेस प्रणीत युपीए सरकारच्या काळात, तत्कालीन गुजरात मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना गुजरात मॅाडेल तयार होतांना, केंद्रात काय त्यांचे डबल इंजिन भाजप सरकार होते काय? केंद्रातील काँग्रेस प्रणीत युपीए सरकारच्या, योजना आयोगाच्या ‘गुजरात विषयी विना अनुकुल भुमिकेमुळे वा विना सहकार्याशिवायच का व्हायब्रंट गुजरात झाला? हे मोदी साहेब सोईस्कर विसरले काय? असा सवालही तिवारी यांनी उपस्थित केला आहे.

त्यावेळी देखील पुर्वीचे पंतप्रधान विकास प्रकल्पांच्या उद्घाटनास विविध राज्यात जात असत. त्यावेळी केंद्राने काय मदत केली ते अभिमानाने सांगत असत. परंतू, राज्यात आमच्याच पक्षाचे डबल इंजिन सरकार आल्यासच विकास होईल,असे तेथील राज्यातील जनतेस एक प्रकारे धमकावत नसत असेही तिवारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *