चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी यांना – चंद्रकांत पाटील यांनी दिले संकेत

Uddhav Thackeray should introspect
Uddhav Thackeray should introspect

पुणे–चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबात पोटनिवडणुकीची उमेदवारी देण्यासाठी कोणाचेही दुमत नाही. इच्छुकांची नावे प्रदेशकडे पाठविली जातील. प्रदेशची कमिटी नाव निश्चित करेल आणि दिल्लीतून उमेदवाराचे नाव जाहीर होईल, सांगत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चिंचवडची उमेदवारी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत दिले. दरम्यान, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अजितदादांपासून उद्धवजींची भेट घेणार आहे. राजकारणात आत्ता काही घडत असल्यास त्याच्या दुस- या मिनिटाला काहीही होवू शकते असे सूचक विधानही त्यांनी केले.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि भाऊ शंकर जगताप यांच्यासोबत एकत्रित पत्रकार परिषद घेवून ‘‘जगताप कुटुंबात दोन गट’’ नसल्याचे सूचित केले.  आता जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप की बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा  जितेंद्र आव्हाड यांचा शरद पवारांनी राजीनामा घ्यावा - चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रकांत पाटील म्हणाले की, निवडणूक झाली, तर कशी ते लढावी याविषयी चर्चा झाली. उमेदवारी कोण असावा हे आम्ही ठरवत नाही. कोअर कमिटी ठरवते. जगताप कुटुंबात दुमत असणे काही कारण नाही. बिनविरोध होण्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत. आम्ही त्यासाठी कामाला लागणार आहोत. सर्वांना निवेदन देणार आहोत. कसबा आणि चिंचवड विधानसभा बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे केवळ आमदार नव्हते. ते पिंपरी-चिंचवड शहराचे लोकनेते होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांच्या निमित्ताने निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल केला आहे. दि. २७ फेब्रुवारी ऐवजी दि. २६ फेब्रुवारीला करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे भाजपाने गाफील न राहता तयारी करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. शक्ती केंद्र आणि बूथ यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे. त्याची जबाबदार संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांच्याकडे आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love