भाजप- मनसेची युती होणार?


पुणे- राज्यात शिवसेनेने विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेत कॉंग्रेस- राष्ट्रवादी बरोबर घरोबा करत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली आणि तिथपासून राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार याचा अंदाज आला होता. शिवसेनेने भाजप बरोबर काडीमोड घेतल्यानंतर जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी मनसे भरून काढणार याला दुजोरा देणाऱ्या अनेक घटना गत काळात घडल्या आहेत. सुरुवातीला मनसेने आपला झेंडा बदलत त्याचा रंग भगवा केला आणि त्यावर राजमुद्रेचा वापर केला, त्याचवेळी मनसे भाजपबरोबर जाणार का? या चर्चेला उधान आले.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या दोघांमध्ये गुप्त बैठकही झाली होती. आता हे दोन्ही पक्ष एकत्र येणार याबाबतआणखी एक महत्वपूर्ण घटना घडत आहे. मनसे लवकरच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा करणार असून येत्या १ ते ९ मार्च दरम्यान या अयोध्या दौऱ्याची नियोजन व तयारी सुरु असल्याचे बोलले जात आहे. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राळेगण सिद्धी येथे राज ठाकरे हे अयोध्येला जाणार आहे ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. प्रभू राम हे सर्वांचे आराध्य दैवत आहे. आणि अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद मिटून आता तिथे भव्य राम मंदिर उभारले जात आहे. त्यामुळे सर्वांनीच अयोध्येला जायला हवे. मी स्वतः अयोध्येला जाणार असल्याचे वक्तव्य केल्याने भाजप-मनसे युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अधिक वाचा  पुणे शहर राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी दीपक मानकर यांची निवड

फडणवीस म्हणाले,  प्रभू राम हे सर्वांचे आराध्य दैवत आहे. आणि अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद मिटून आता तिथे भव्य राम मंदिर उभारले जात आहे. त्यामुळे सर्वांनीच अयोध्येला जायला हवे. मी स्वतः अयोध्येला जाणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love