Lotus dupatta is ready for those coming to BJP

उद्धव ठाकरे यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही – बावनकुळे

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

चिखली / छ. संभाजी नगर – महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) बट्ट्याबोळ केला. त्यांच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न डॅमेज करण्यात आला. आता त्यांना या प्रश्नावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी आक्रमक टीका भारतीय जनता पार्टीचे (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrakant Bavankule) यांनी केली.

शनिवारी ते चिखली (जि. बुलढाणा) व छ. संभाजी नगर येथे माध्यमांशी बोलत होते. मराठा आरक्षणाच्या विषयावरून राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर त्यांनी आपले मत प्रगट केले. श्री बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) पाच वर्षे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे साठ मोर्चे निघाले. त्यावेळी कुठेही सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले नाही. कुठेही गालबोट लागले नाही. मात्र शुक्रवारी या प्रकरणास गालबोट लागले. यामुळे या घटनेची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मराठा समाजास संयमी आहे. मराठा समाजाने नेहमीच्या राज्याला प्रगतीकडे नेले आहे, असेही ते म्हणाले.

सकल मराठा समाजाची मागणी नेहमीच सकारात्मक राहिली आहे. फडणवीस सरकारने मराठा आरक्षण उच्च व सर्वोच्च न्यायालयात टिकविण्यासाठी प्रयत्न केले. उद्धव ठाकरे यांना सरकारमध्ये असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न योग्य प्रकारे हाताळता आला नाही. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा समाजाचे दोन मोठे नेते सरकारमध्ये आहेत, त्यांच्यासोबतीला देवेंद्र फडणवीस यांचाही अनुभव आहे. यावर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी भाजपा मराठा समाजाच्या व मागणीच्या पाठीशी आहे.

मराठा समाजाची दिशाभूल केली

उद्धव ठाकरे हे केवळ फेसबुकवर राहणारे नेते आहेत, आता ते बावचळलेल्या अवस्थेतून बाहेर येत आहेत. सरकार असताना त्यांना हा प्रश्न सोडविला नाही, तेव्हा ते झोपले होते का?. काही नेत्यांनी मागणी ३०-४० वर्षांत मराठा समाजाची दिशाभूल केली, मराठा समाजात आजही आर्थिक दुर्बल घटक आहेत. त्यांना मदत करण्याची गरज आहे. विजय वेडेट्टीवार यांनी आरक्षणाची मागणी करणे योग्य असले तरी आताच्या सरकारवर त्यांची टिप्पणी करण्याची योग्य वेळ नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

राजकारण करू नका – बावनकुळेंचे आवाहन

अमतरवाली येथे झालेल्या घटनेवरून कुणीही राजकारण करू नये. आंदोलक व जखमींना भेटण्यासाठी येणाऱ्यांनी अवश्य यावे. पण राजकारण करू नये असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *