gtag('js', new Date());
  • Home
  • महाराष्ट्र
  • 100 पुरोहितांकडून शुभाशीर्वाद घेतल्यानंतर राज ठाकरे औरंगाबदला रवाना
Image

100 पुरोहितांकडून शुभाशीर्वाद घेतल्यानंतर राज ठाकरे औरंगाबदला रवाना

Spread the love

पुणे—महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तब्बल 100 पुरोहितांकडून शुभाशीर्वाद घेतल्यानंतर शंभरहून अधिक गाड्यांचा ताफा घेऊन औरंगाबादच्या दिशेने आज सकाळी रवाना झाले.

ठाकरे यांच्या घराबाहेर शंभरहून अधिक पुरोहितांनी विश्वाच्या कल्याणासाठी शांतीसुप्त पाठ हे सामूहिक मंत्र पठण केले. पुरोहितांनी राज ठाकरे यांना आशीर्वाद देखील दिला. राज ठाकरे यांच्या उद्याच्या आणि तेथून पुढील सभेला विजय आणि यश प्राप्त होण्यासाठी संपूर्ण पुणे शहराच्या वतीने पुरोहित वर्गाच्या वतीने आम्ही मंत्रांद्वारे आशीर्वाद देणार आहोत. दीर्घ आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त व्हावे आणि त्यांची जी हिंदूजननायकाची भूमिका आहे. त्या करिता मंत्रांचा, दैवतांचा आशीर्वाद आणि पाठींबा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तसेच, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांमधील मंत्रांचा आशीर्वाद दिला जाणार आहे.”, असे यावेळी पुरोहितांनी सांगितले.  

अधिक वाचा  #मराठा आरक्षण: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकार जबाबदार - मराठा आरक्षण समिति

राज ठाकरे हे पुण्याहून निघल्यानंतर त्यांनी तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. गुडीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांनी येत्या ३  मे पर्यंत मशिदींवरील भोंग्यांच्या बाबतीत अल्टिमेटम दिला आहे. उद्या (१ मे) औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेला सशर्त परवानगी देण्यात आली असली तरी राज्यभरातून मोठ्या संख्येने मनसैनिक हजर राहणार आहेत. उद्या औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

३ मे रोजी मंदिरांमध्ये महाआरतीचे आयोजन

दरम्यान ३ मे रोजी रमजान ईद आणि अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पुणे शहर मनसेकडून पुण्यातील सर्व मंदिरात महाआरतीचे आयोजन देखील करण्यात आले आहे. त्या संदर्भात मनसेकडून तयारी सुरू झाली असून आज(शनिवार) शहर कार्यालयात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल त्यांच्या संलग्न असलेल्या सात ते आठ संघटनांनी यासाठी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच त्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Related Posts

Thalapathy Vijay TVK: तामिळनाडूच्या राजकारणात ‘थलपती’ वादळ; एका अपमानाचा असा घेतला बदला!

Spread the love

Spread the love सुमारे १३ वर्षांपूर्वीची ती घटना आहे. तमिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एका अभिनेत्याचा असा काही अपमान केला…


Spread the love
ByByNews24Pune May 12, 2026

पुण्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक; पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)— राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर पुणे जिल्ह्यातील आळंदी म्हातोबा शनिवारी…


Spread the love
ByByNews24Pune May 9, 2026

राज्यकर्त्यांना पत्रकारांच्या लेखणीची आणि त्यांच्या बोलण्याची भीती वाटेनाशी झाली आहे- राज ठाकरे

Spread the love

Spread the love पुणे: “आजच्या काळात राज्यकर्त्यांना पत्रकारांच्या लेखणीची आणि त्यांच्या बोलण्याची भीती वाटेनाशी झाली आहे. ‘तुमच्या लिहिण्याने…


Spread the love
ByByNews24Pune Apr 29, 2026

नारी शक्ती वंदन अधिनियम: महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी १६ एप्रिलपासून संसदेचे विशेष सत्र

Spread the love

Spread the love पुणे(प्रतिनिधी)–भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून, भारताच्या राजकीय पटलावर महिलांच्या सक्षमीकरणासाठी…


Spread the love
ByByNews24Pune Apr 14, 2026

100 पुरोहितांकडून शुभाशीर्वाद घेतल्यानंतर राज ठाकरे औरंगाबदला रवाना

by News24Pune time to read: <1 min
0