नाटक,लोककला अंतर्गत तमाशा लावणी व इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी


पुणे -सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कार्यचालन कार्यपध्दतीचा अवलंब करुन नाटक, लोककला अंतर्गत तमाशा लावणी व इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाना परवानगी देण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे व त्यातील पोट कलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागु करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीची अंमलबजाणीसाठी अधिसूचना निर्गमित केलेल्या आहेत.

परंतु काही जिल्ह्यांमधून सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, लोककला अंतर्गत तमाशा, लावणी इत्यादी कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात आल्या बाबतच्या तक्रारी लोकप्रतिनिधी मार्फत विभागास प्राप्त होत असल्याचे लक्षात घेता शासन निर्णयास अनुसरून व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दि. 5 नोव्हेंबर 2020 प्रमाणे निर्गमित करण्यात आल्याप्रमाणे कार्यचालन कार्यपध्दतीचा अवलंब करुन नाटक, लोककला अंतर्गत तमाशा लावणी व इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी देण्याबाबत कार्यवाही व्हावी, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  ईएसआयसी एससी एसटी एम्प्लॉईज अँड ऑफिसर्स असोसिएशन, पुणेच्या वतीने भीमजयंती फेस्टिवल उत्साहात साजरा