पुण्यातील  वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावर भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांचा दावा : महायुतीत महानाट्य रंगण्याची शक्यता

Former BJP MLA Jagdish Mulik's claim on Vadgaon Sheri Assembly Constituency
Former BJP MLA Jagdish Mulik's claim on Vadgaon Sheri Assembly Constituency

पुणे(प्रतिनिधि)–पुण्यातील  वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावर  भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक   यांनी दावा केला आहे. महायुतीत जागावाटप होण्याआधीच जगदीश मुळीक यांनी आगामी विधानसभा निवडणूक वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून लढवणार असल्याचा दावा केला आहे. तसे फ्लेक्स मुळीक यांच्या समर्थकांकडून मतदारसंघात लावण्यात आले आहेत. मुळीकांची लोकसभेची नाराजी विधानसभेला भाजप तिकिट देऊन दूर करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या मतदार संघात सध्या राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत. मुळीक यांच्या दाव्याने वडगावशेरी मतदारसंघावरून महायुतीत महानाट्य रंगण्याची शक्यता आहे.

 जगदीश  मुळीक हे टिंगरे यांचे परंपरागत विरोधक असून त्यांनी विधानसभेची एक निवडणूक टिंगरेंच्या विरोधात जिंकली होती तर एका निवडणुकीत त्यांनी पराभव पत्करावा लागला होता. यामुळे महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. वडगावशेरी  मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून जगदीश मुळीक विधानसभाच्या तयारीला लागले आहेत. लोकसभेसाठी जगदीश मुळीक हे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र भाजपने   जगदीश मुळीक यांचं तिकीट कापत मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेची उमेदवारी दिली होती.  लोकसभा निवडणुकीला एक पाऊल मागे घेत  मुळीक यांनी मुरलीधर मोहोळ यांचा जोर दार प्रचार केला, म्हणून आता मुळीक यांना विधानसभेचे वेध लागले आहेत. तशी त्यांनी कामाला सुरुवात देखील केली आहे.

अधिक वाचा  'कसे आहात?' एवढे शब्दही ज्येष्ठांसाठी टॉनिक : वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोनपे

‘हिट अँड रन’ प्रकरणात सुनील टिंगरे चर्चेत

सध्या वडगावशेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे हे बंडखोरीनंत शरद पवार गटामध्ये सहभागी न होता अजित पवार यांच्याबरोबर गेले. पुण्यातील पोर्शे प्रकरणानंतर  सुनील टिंगरे हे चांगलेच चर्चेत होते. पोर्शे  प्रकरण पुण्यातल्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहोचलं. आमदार सुनील टिंगरे यांनी प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला अशी चर्चा होती. परंतु, आपण फक्त आढावा आणि माहिती घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो असं स्वतः सुनील टिंगरे यांनी माध्यमापुढे येऊन सांगितलं होते. पण अजूनही  हा  विषय संपलेला नाही.  त्यामुळे आता ही जागा सुनील टिंगरे यांचा विचार होणार का, याकडे वडगावशेरीमधील मतदारांच लक्ष लागलं आहे.

महायुतीत महानाट्य रंगण्याची शक्यता

२०१४ विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आमदार जगदीश मुळीक यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता.  त्यावेळी असलेल्या मोदी लाटेत शहरातील आठही मतदारसंघात भाजपचे कमळ फुलले होते. त्यानंतर २०१९ साली निवडणुकीत तर वडगावशेरी, हडपसर हे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. या मतदारसंघातून एकदा विजयी झालेले भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक हे आता विधानसभेसाठी इच्छुक असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. जगदीश मुळीक हे लोकसभेसाठी देखील  निवडणूक  लढवण्यास इच्छुक होते. मुळीकांची लोकसभेची नाराजी विधानसभेला भाजप तिकिट देऊन दूर करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे वडगावशेरी मतदारसंघावरून महायुतीत महानाट्य रंगण्याची शक्यता आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love