T

#Sharad Pawar लवकरच आणखी एका राज्यातील मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याचा या सरकारचा डाव – शरद पवार

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

Sharad Pawar – तुरुंगात(Jail) जाण्यापेक्षा भाजपाच((BJP) बरा, अशी भूमिका देशातील(Pune) अनेक नेत्यांना घेतली आहे. मात्र, काही नेत्यांनी न झुकता तुरुंगात जाणे पत्करले आहे. झारखंडच्या(Zarkhand) मुख्यमंत्र्यांनाही(CM) टाकण्यात आले असून, लवकरच आणखी एका राज्यातील मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याचा या सरकारचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे(NCP) संस्थापक शरद पवार (Sharad Pawar)यांनी बुधवारी येथे केला. (This government’s plan to put the Chief Minister of another state in jail)

पुणे जिल्हय़ातील मंचर(Manchar) येथील शरदचंद्र पवार गटाच्या सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, पक्ष फोडणे आणि लोकांना तुरुंगात टाकणे, हाच मोदी सरकारचा एक कलमी कार्यक्रम बनला आहे. झारखंड हे आदिवासींचे राज्य आहे. त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejrival) चांगले राज्य चालवतात. मात्र, ते पंतप्रधानांना आवडत नाही, म्हणून त्यांच्या दोन चार मंत्र्यांना अटक केली. केजरीवाल यांना १६ नोटीस पाठवल्या. आज ना उद्या केजरीवाल यांनाही अटक होईल, हे काय चाललेय? असा सवाल पवार यांनी केला.

शेतकऱयांच्या पदरात काही पडत नाही. अनेक पीके घेतली जातात. पण त्या पिकांची किंमत शेतकऱयांच्या पदरात पडत नाही. खर्च अधिक, उत्पन्न कमी, अशी  स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. त्यातून शेतकरी आत्महत्या होतात. हे चित्र फक्त राज्यात नाही, तर सबंध देशात आहे. मात्र, हे सरकार शेतकऱयांना हात देताना दिसत नाही, अशी टीका पवार यांनी केली. 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रोज एक जाहिरात प्रसिद्ध होत आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो. मोदींची गॅरंटी, एका बाजूला यांची गॅरंटी आणि दुसऱया बाजूला दर दिवसाला कोणी ना कोणी शेतकरी आत्महत्या करतोय, हे चित्र पाहायला मिळत आहे. ही स्थिती किती दिवस चालू द्यायची. यात बदल करायचा की नाही, ठरवले, तर आपण हे करू शकतो, असा निर्धारही पवार यांनी बोलून दाखविला. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *