Scam of six and a half thousand crores in health department

#Rohit Pawar: अजितदादांच्या अवतीभवती मलिदा गँग – रोहित पवार

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

Rohit Pawar – उपमुख्यमंत्री(DCM) अजित पवार(Ajit Pawar) यांच्या(Pune) अवतीभवती पिंपरी-चिंचवड(Pimpri-Chinchwad) शहरातील ठेकेदार(Contractor), मलिदा गँग(Malida Gang) होती. अजित पवार(Ajit Pawar) यांना सामान्य लोकांपर्यंत पोहचू दिले जात नव्हते. ठराविक लोकांकडेच ते जात होते. मलिदा गँग तिकडे गेल्यानंतर प्रामाणिक कार्यकर्ते आमच्याकडे राहिल्याचे शरद पवार गटाचे(Sharad Pawar Group) आमदार रोहित पवार(Rohit Pawar) म्हणाले.

पिंपरीत पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने मराठा  समाजाला १६ टक्के, भाजपच्या काळात १३ टक्के तर आता १० टक्के आरक्षण दिले. मराठा समाजाची २८ टक्के लोकसंख्या असताना १० टक्के आरक्षण का दिले, लोकसभा  निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेतला की काय अशी भीती वाटते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण टिकविण्यासाठी प्रयत्न करु सांगितले. प्रयत्न हा शब्द राज्यकर्त्यांना मतदान मिळवून देईल पण सामान्य लोकांसाठी घातक ठरु शकतो. 

अजित पवार यांच्याबाबत बोलत असलो तरी सुनेत्रा पवार यांच्याबाबत बोलणार नाही, कारण त्या राजकारणात नव्हत्या. समाजकारणात काम करतात. बारामतीत लढत  सुप्रिया सुळे विरुद्ध  अजित पवार अशीच होणार आहे. अजित पवार यांची भूमिका लोकांना आवडली नाही. मलिदा गँग, सत्तेचे की विचारांचे ऐकायचे हे लोकच ठरविणार आहेत. शरद पवार यांच्या दृरदृष्टीमुळेच पिंपरी-चिंचवडचा विकास झाला.  महापालिकेचा अर्थसंकल्प सामान्य लोकांसाठी नव्हे तर ठेकेदारांसाठी आहे, असेही ते म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *