काँग्रेसला सत्तेच्या दलालांपासून दुर ठेवले पाहीजे या स्व. राजीव गांधीच्या विधानाची प्रचिती येत आहे –गोपाळदादा तिवारी


पुणे- देशातील आजची राजकीय परिस्थिती पाहता, देशास २१ व्या शतकाची दृष्टी देणारे, संगणक, मोबाईल व डीजीटल क्रांतीचे जनक दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या “भारतीय राष्ट्रीय काँग्रेस”च्या शताब्दी महोत्सवातील …”काँग्रेसला सत्तेच्या दलालांपासून दुर ठेवले पाहीजे”… या विधानाची सद्यस्थितीत पुरेपूर प्रचिती येत असल्याचे प्रतिपादन राजीव गांधी स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष व काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.

काँग्रेस श्रेष्ठींनी अनेक नेत्यांना मोठ्या विश्वासाने जबाबदाऱ्या व पदें बहाल केली. वेळोवेळी सत्तेच्या माध्यमातून विकासाची संधी दिली.

काँग्रेसचे ऊद्दीष्ट हे सतत महात्मा गांधींच्या ‘लोककल्याणकारी राज्याचे’च् राहीले असल्याने, काँग्रेस काळांत देशाच्या राष्ट्रीय संपत्तीत कित्येक पटींनी वाढ होऊन दरडोई उत्पन्न ही वाढल्याचेच पहायला मिळाले आहे.

अधिक वाचा  वडेट्टीवार यांच्या बोलण्याला काडीचीही किंमत नाही - विनायक मेटे

मात्र, मोदी सरकार काळांत देशावरील वाढलेले तिप्पट कर्ज, दुप्पट महागाई, वाढती बेरोजगारी व शेतकरी आत्महत्या होत असतांना, देश दुर्गतीकडे जात असतांना, देशास वाचवायची गरज असतांना, समाजकारण, देशसेवेचे व काँग्रेसच्या तत्व-निष्ठेचे व्रत घेतलेले नेते अखेर विचारांनी तकलादू, स्वार्थी व संधीसाधू असल्याचेच पहायला मिळते आहे. भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्यांनाच् मोदी_शहांचा भाजप ‘हुकुमशाहीच्या सत्तेत’ निर्लज्जपणे सन्मानाने घेत आहे, हीच देशाची शोकांतिका आहे.

वास्तविक अशा निर्णायक वेळी, ‘देशास काँग्रेसची गरज असतांना, संविधान, समता, सामाजिक सलोखा, धर्मनिरपेक्षता व लोकशाही वाचवण्याची गरज असतांना, स्वतःच् स्वीकारलेल्या तत्वे व मुल्यांना तिलांजली देत, व्यक्तिगत स्वार्थासाठी पक्ष बदलणे व हुकमशहाच्या कळपात जाणे म्हणजेच ‘सत्तेची दलाली’ निभावणे होय अशी कडवट टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

अधिक वाचा  जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन घोटाळा : फारूक अब्दुल्ला आणि इतरांकडून १२ कोटींची संपत्ती जप्त

देशास स्वातंत्र्य मिळवण्या पासून ते कृषिप्रधान देश बनवणे पर्यंत, स्वातंत्र्योत्तर भारतात शिक्षणाचे प्रमाण ५ पट वाढवत, सेटलाईट्स, क्षेपणास्त्रे, संगणक, डीजीटल  क्रांती घडवण्या पर्यंत काँग्रेसच्या योगदानाचा सत्य व वास्तविक वरचष्मा’  अनैतिक व खोटारडे पणाच्या वावटळीत पायदळी तुडवण्याचे काम

मोदी – शहांच्या भाजप कडून होत असतांना, स्वपक्षाशी व तत्वांशी ईमान राखून, खंबीरपणे ऊभे रहाण्याऐवजी नथुरामाच्या बाजुने ऊभे रहाण्यासाठी, प्रसंगी स्वार्थासाठी पक्ष बदल करत असतील..तर ते केवळ सत्तेचे दलाल आहेत. ज्यांच्या पासून ‘काँग्रेस वाचवण्याची’ गरज तत्कालीन पंतप्रधान व काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधी यांनी त्यावेळीच् बोलून दाखवली होती. त्याचीच आज प्रचिती येत असल्याची खंत काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी व्यक्त केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love