राष्ट्रवादीत मोठा भूकंप : अजित पवारांबरोबर 40 आमदार?: राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळणार


पुणे – राज्याच्या राजकारणामध्ये आज सकाळपासून मोठी घडामोड बघायला मिळत आहे.  सकाळी अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह त्यांनी थेट राजभवन गाठले आणि संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. राजभवनामधली तयारी बघितल्यानंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठा भूकंप झाल्याचे सिद्ध झाले.  अजित पवार राजभवनामध्ये आपल्या समर्थक आमदारांसह आणि नेत्यांसह दाखल झाले आहेत तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही त्या पाठोपाठ दाखल झाले.  भाजपचे अनेक मंत्री, नेते प्रदेशाध्यक्ष बावनकुळे ,हेही दाखल झाले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हेही दाखल झाले आहेत.

राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये धनंजय मुंडे, हसनमुश्रीफ, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरेआदी  नेते उपस्थित आहेत.  दरम्यान आजच्या शपथविधी मध्ये फक्त राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे नेते शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे यांनी सांगितले. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार म्हणजे राज्याला दोन उपमुख्यमंत्री आहेत.

अधिक वाचा  राष्ट्रवादीचे नेते आणि दाभोलकर परिवार ‘सीबीआय’ला अपयशी ठरवत असतील, तर ते त्यांचेच अपयश - सनातन संस्था

दरम्यान, सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे 40 आमदार असल्याचे बोलले जात आहे.शिवसेनेच्या फुटी नंतर राष्ट्रवादीची ही फुट हा राज्यातील राजकारणामधील मोठा भूकंप मानला जात आहे

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love