चाकणच्या जिल्हा परिषद शाळा नंबर 2 चे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

महाराष्ट्र शिक्षण
Spread the love

चाकण – चाकण येथील जिल्हा परिषद शाळा नंबर 2 ने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2021 मध्ये घवघवीत यश प्राप्त केले. यामध्ये दहा विद्यार्थिनी गुणवत्ताधारक ठरलेल्या आहेत. विद्यार्थिनीं, ईश्वरी थोरात ही २८४ गुण मिळवून शहरी राज्य गुणवत्ता यादीत ५वी व जिल्हा गुणवत्ता यादीत ३री आली आहे.

शाळेच्या मुख्याध्यापिका कमलताई खेडकर मॅडम आणि पालकांच्या उपस्थितीत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थिनींचा सन्मान सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी विद्यार्थिनीं-ईश्वरी थोरात, श्रुती डौले हिने शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. इंदुमती पवार मॅडम यांनी विद्यार्थिनींचे व पालकांचे विशेष कौतुक केले.

मुख्याध्यापिका कमलताई खेडकर मॅडम यांनी या यशाचे खरे मानकरी विद्यार्थी आहेत हे गौरवोद्गार काढले.या गुणवंत विद्यार्थिनींना पेन्सिल बॉक्स, गुलाब पुष्प ,पेढा भरवून कौतुक करण्यात आले. चाकण नंबर दोन शाळेची अखंडित यशाची परंपरा विद्यार्थ्यांनी चालू ठेवल्यामुळे मुख्याध्यापक पालक यांना अत्यानंद झाला. या विद्यार्थिनींचा व त्यांच्या मार्गदर्शक सौ. मेघा संदेश गावडे मॅडम, सौ. कविता आल्हाट मॅडम ,श्री .हनुमंत कलवडे सर या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे साहेब यांच्या प्रेरणेने, विस्तार अधिकारी जीवन कोकणे,साधना वाघोले,अलका जगताप, केंद्रप्रमुख हिरामण कुसाळकर,शा.व्य. समिती अध्यक्षा रुपाली भुजबळ,मुख्याध्यापिका कमलताई खेडकर यांचे मार्गदर्शन या विद्यार्थिनींना लाभले.

शिष्यवृत्ती गुणवंत विद्यार्थिनी याप्रमाणे – ईश्वरी थोरात- 284 गुण, श्रुती डौले -262 गुण, आफ्रिन शेख- 234 गुण, समृद्धी कानवडे- 232 गुण, समृद्धी  चव्हाण -232 गुण, वैष्णवी शेजुळ -232 गुण, श्रुती थोरात – 224 गुण, प्रियांका  गच्चे-  222 गुण, श्रद्धा मुसळे – 214 गुण, आदिती वाळुंज – 210 गुण

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *