राज ठाकरे आत्मनिरीक्षण करा अन्यथा..’लोका सांगे ब्रम्हज्ञान’… असे व्हायला नको -गोपाळदादा तिवारी

‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा

पुणे– खालच्या पातळींवरील राजकारणावर आसुड ओढणाऱ्या राज ठाकरेंनी दुसऱ्या नेत्यांबद्दल बोलताना आपण स्वतः कोणत्या पातळींवर आहोत याचे देखील आत्मपरीक्षण करावे. अन्यथा “लोका सांगे ब्रम्हज्ञान… असेच  म्हणावे लागेल असा टोला कॉँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील मनसे गटाध्यक्षांच्या मेळाव्यात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्यासदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. त्याचा समाचार तिवारी यांनी घेतला आहे.

राज ठाकरे नेहेमी प्रमाणे गरळ ओकत असले तरी देखील, राहुलजींच्या तत्वाप्रमाणे, ज्यांना काँग्रेसच्या नेत्यांची भिती आहे तेच द्वेष व तिरस्कार करतात,या धोरणाने आणि ‘नफरत छोडो’ तत्वा प्रमाणे राज ठाकरेंना आम्ही माफ करतो, असे तिवारींनी म्हटले आहे. 

अधिक वाचा  पुण्यातील शाळा १ फेब्रुवारीपासून सुरु होणार, मात्र....

२०१४ व २०१९ मध्येही ५० खासदार व ५ राज्यात सत्ता आणणाऱ्या व देशात आजही क्र. २ चे स्थान असणाऱ्या काँग्रेसच्या राहुलजींचे नेतृत्व कुठे तर, भारतात १ आमदाराचे संख्याबळ असणाऱ्या मनसेचे नेतृत्व कुठे? त्यामुळे कोणी कोणाची लायकी तपासावी वा मेंदू तपासावा?  हे शहाण्यास सांगणे ना लगे. मध्यंतरीचा काही काळ राज ठाकरे ‘सत्य कथन करीत होते’ हेच त्यांचे ‘पुर्वसंचित पुण्य-कर्म’ आहे, म्हणूनच काँग्रेस पक्ष त्यांच्याप्रती दया व्यक्त करतो, असा उपरोधिक टोलाही तिवारी यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

दरम्यान, ‘वि. दा. सावरकरांच्या माफीनाम्याची व ब्रिटीशांकडुन पेन्शन स्वीकारण्याची तुलना श्रीकृष्ण-निती’शी करून’ नव-हिंदुत्ववादी राज ठाकरेंनी अकलेचे तारे तोडले आहेत. जगास ‘सत्यधर्माची शिकवण’ देणाऱ्या श्रीकृष्णांच्या ‘गिता’ उपदेशाचा राज ठाकरे यांनी अभ्यास करावा आणि मगच व्यक्त व्हावे असे गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले आहे. एका राजकीय पक्षास आपली राजकीय, तात्विक व वैचारीक भुमिका – ध्वज इ. ‘सत्ताघिशांच्या व ईडी’च्या दबावाखाली बदलावी लागते हीच् लोकशाहीची शोकांतिका असल्याची टीकाही तिवारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love