अजित पवारांबरोबर राष्ट्रवादीच्या या 9 मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ : कर्तुत्ववान कार्यकर्त्याला जेव्हा दुय्यम स्थान दिले जाते, त्यावेळी अशा घटना घडतात-कोण म्हणाले असे?


मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज मोठा भूकंप घडून राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या नऊ सहकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.  दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर आजचा हा शपथविधी म्हणजे अजित पवारांची गद्दारी की बंड असा प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला जात आहे.

आज सकाळी अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी त्यांच्या समर्थक आमदारांची बैठक पार पडली.  या बैठकीनंतर राज्यातील राजकारणामध्ये काही क्षणातच मोठ्या घडामोडी घडल्या.  अजित पवार आपल्या समर्थकांसह थेट राजभावनाकडे रवाना झाले.  त्या पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजपाचे अनेक मंत्री प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे रवाना झाले.  त्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दाखल झाले. राजभवनामध्ये बघितल्यानंतर शपथविधीची पूर्ण तयारी त्या ठिकाणी केलेली असल्याचे दिसून आले याचाच अर्थ या सर्व घडामोडींचा राज्यातील जनतेला किंवा प्रसार माध्यमांना कुठला मागमूस  नव्हता

अधिक वाचा  ‘सत्यमेव जयते’च्या ब्रीद शिवाय राष्ट्रीय बोध-चिन्ह ‘अशोक स्तंभ’ हे अपूर्ण’ प्रदर्शीत…! - गोपाळदादा तिवारी

गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवारांच्या पहाटेच्या बंडानंतर पुन्हा एकदा अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या.  अजित पवार विरोधी पक्षनेते असतानाही ते आक्रमक दिसत नाहीत अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू होती.  तसेच अजित पवार सुद्धा अनेक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या काही वक्तव्यांचे समर्थन केल्याचे दिसून येत होते.  त्यामुळे अजित पवार पुन्हा एकदा भाजपबरोबर जाणार या चर्चा सुरू होत्या, त्याची प्रचिती आज आली.

 अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे आदिती तटकरे अनिल भाईदास पाटील धर्माराव बाबा अत्राम संजय बनसोडे सुनिल टिंगरे या 9 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कर्तुत्ववान कार्यकर्त्याला जेव्हा दुय्यम स्थान दिले जाते, त्यावेळी अशा घटना घडतात. यापूर्वीही आपण हे पाहिले आहे. मात्र, अजित पवार आमच्याबरोबर आल्याने त्याचा विकासाला फायदा होईल, विकासाचा वेग वाढेल. आता 1 मुख्यमंत्री आणि 2 मुख्यमंत्री ट्रीपल इंजिनामुळे विकासाची गाडी जोरदार वेगाने पळणार. राज्याचा विकास ज्या वेगाने सुरू आहे त्याला अजित पवारांनी साथ दिली आहे, असेही ते म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love