अजित पवार थोड्याच वेळात घेणार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ : राष्ट्रवादीत मोठी फुट :


पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज सकाळपासून पक्षपातळीवरच्या घडामोडींना वेग आला आहे. मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते यांच्या अजित पवार देवगिरि निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोअर कामिटीची आणि आमदारांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. दरम्यान, आमदारांनी एकमुखी अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करावे अशी एक मुखी मागणी केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या बैठकीनंतर अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह राजभावनावर दाखल झाले आहेत.

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही राजभावनाकडे  गेले आहेत. दरम्यान, दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार अशी चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह राजभवनावर आले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि भाजपचे नेते दाखल झाले आहेत. त्यामुळे थोड्याच वेळात अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ होणार असे बोलले जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अजित पवार यांनी पहाटे घेतलेल्या शपथविधीवरून गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर आजची घडामोड महत्वाची मानली जात आहे.

अधिक वाचा  'घर चलो'अभियानाच्या माध्यमातून भाजपा कार्यकर्ते दहा लाख घरात पोहोचणार

अजित पवार यांच्या बरोबर राष्ट्रवादीचे काही आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनात शपथविधीची तयारी सुरू आहे. त्यामध्ये मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेतील अशी शक्यता आहे.

दरम्यान, राज भावनाच्या दरबार मधील शपथविधीची तयारी बघता हे सर्व अगोदरच ठरले होते हे निष्पन्न झाले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love