राजकारणामध्ये कधीही अशी परिस्थिती पहायली नव्हती – दिलीप वळसे पाटील


पुणे–‘एखाद्याच्या घरी चौकशी करणे ठिक आहे. परंतु, त्यांच्या सगळ्याच नातेवाईकांच्या घरी सुद्धा जाणे आणि त्रास देणे हे काही बरोबर नाही’ अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.यापूर्वीच्या काळात राजकारणामध्ये कधीही अशी परिस्थिती पहायली नव्हती,असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाने छापा टाकला असून दोन दिवसांपासून कारवाई सुरु आहे. यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची प्रतिक्रिया दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधीत कारखाने, विविध संस्था, त्यांच्या तीन बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला. तसेच त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावरही छापा टाकला. ही कारवाई तिस-या दिवशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईवरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

अधिक वाचा  राजेंद्र जगताप व अरुण पवार यांच्यावतीने अजित पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा :पिंपळे गुरवमध्ये वृक्षारोपण, अंध अपंगांना धान्य वाटप

पिंपरी-चिंचवड शहरात एका खासगी कार्यक्रमासाठी आज (शनिवारी) आलेले राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ”केंद्र सरकार त्यांच्याकडे असलेल्या एजन्सींचा आणि सत्तेचा वापर हा राजकीय कारणासाठी करत आहे. यापूर्वीच्या काळात राजकारणामध्ये कधीही अशी परिस्थिती पहायली नव्हती. त्यामुळे जे काही असेल. समजा एखाच्या घरी चौकशी करणे ठिक आहे. परंतु, त्याच्या नातेवाईकांच्या घरी सुद्धा जाणे आणि त्रास देणे हे काही बरोबर नाही”.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love