पुण्यात अजित पवार यांच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर

राजकारण
Spread the love

पुणे -उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या तीन बहिणींवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरु आहे. यात पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील बहिणींचा समावेश आहे. या प्रकरणी अजित पवार आणि खुद्द शरद पवार यांनी भाजपला टोला लगावलाय. त्यानंतर आता पुण्यात अजित पवार यांच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी पुण्यातील विधान भवनासमोर मानवी साखळी तयार करून जोरदार घोषणाबाजी केली.

अजित पवार यांच्या समर्थनात आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, अंकुश काकडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. हिमालयापुढे सह्याद्री कधीही झुकलेला नाही आणि झुकणार नाही. अजित पवार यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई सुरु आहे. जनताच आता भाजपला प्रत्युत्तर देईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप आणि राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी यावेळी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते विधान भवनासमोर आक्रमक झाले होते.  त्या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी अजित पवार विधान भवनाबाहेर आले  आणि त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *