पुणे- सर्वसामान्यांना शिक्षण मिळू नये अशा पद्धतीचे सत्ताधाऱ्यांचे धोरण असल्याची टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली.
राज्यात आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ (होमवर्क) बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू आहे, यावरून पवार यांनी वरील टीका केली. पुण्यातील पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोशिएशनच्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.या कार्यक्रमाला खासदार गिरीश बापट, यामध्ये राज्यभरातील विश्वस्थ संस्था, प्रतिनिधी, वकील, धर्मदाय आस्थापनेतील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने विश्वस्थ परिषदेत सहभागी झाले होते.
राज्यात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शाळेतून गृहपाठ देणे बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी स्वतः याबाबत माहीती दिली आहे. त्यामुळे सध्या राज्य सरकारवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
पवार म्हणाले, सरकारने पुस्तकांवर जीएसटी लावला. त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही टीका केली आहे. राज्यपालांनी सावित्रीबाई फुले यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा संदर्भ देत शरद पवारांनी. राज्यपाल अत्यंत वाईट भाषेत बोलले यावरुन त्यांची मानसिकता दिसते अशी टीका केली.
शरद पवार म्हणाले की, संस्था आणि धर्मादायामध्ये सुसंवाद ठेवणे गरजेचे. दिड वर्षांपूर्वी १-२ जिल्ह्यांची बैठक घेतली त्याचा प्रचंड फायदा झाला. धर्मदाय कार्यालयाशी सुसंवाद ठेवला तर संस्थांना मोठा लाभ होतो, हे अनेकदा पाहिलेलं आहे. देवस्थानच्या मालकीचे प्रश्न वाढलेत, ते निकाली कसे काढता येतील याकडे लक्ष द्यायला हवं. कारण गावागावात जागांवरून संघर्ष पाहायला मिळतो. तो मिटायला हवा असं शरद पवार म्हणाले.
केंद्र सरकार, राज्य सरकार, संस्था चालक आणि धर्मदाय यांच्यात सुसंवाद कसा ठेवता येईल? या दृष्टीने विचार करायला हवा. त्यावेळी संस्था आणि धर्मदाय यांच्या सर्व प्रश्नांची उकल होईल. कायमची यंत्रणा सुरु ठेवण्यासाठी आपण सर्वोतोपरी दक्षता घेऊयात. अनेकजण न्यायालयात जातात, मी त्यांना विचारलं तुम्ही न्यायालयात का जाता? तर त्यांचं म्हणणं आहे की, जो कर आमच्याकडून घेतला जातो तो आम्हाला अमान्य आहे. याबाबत त्यावर आपण तोडगा काढला तर धर्मदायचा अडकलेला निधी उपयोगात येईल असं शरद पवार.
माणिकराव गावित यांना श्रद्धांजली
तब्बल आठ वेळा खासदार म्हणून संसदेत निवडून आलेले लोकप्रिय नेते आणि माजी मंत्री माणिकराव गावित यांचे आज निधन झाले. त्यांना शतधानजली वाहताना पवार महाणले, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये माझे सहकारी होते. मी त्यांना इतक वर्ष जवळून पाहिले आहे. सामान्य कुटुंबातून आणि आदिवासी भागातून आलेला माणूस होता. परंतु समाजातील सर्व उपेक्षित घटकाच्या प्रश्नासाठी अंत्यत जागरूकपणे भूमिका घेणार व्यक्तिमत्व होत. आज माणिकरावच जाण्यानं राज्याच्या आदिवासी आणि गरीब जनतेच्या दृष्टीने चिंता करणारी बाब आहे. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.