सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आढळला सहा फूटी किंग कोब्रा


पुणे –सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शुक्रवारी (दि.२६)  मुलांच्या वसतिगृहाजवळ ‘किंग कोब्रा’ आढळल्याने खळबळ उडाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या वसतीगृहामध्ये विद्यार्थी नाहीत. दरम्यान,  विद्यापीठाचे सुरक्षारक्षक सुनील यांनी या किंग कोब्राला पकडून सुरक्षित ठिकाणी जंगलात सोडले.

शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुलांचे वसतिगृह क्रमांक ९ येथील केबिनमध्ये नाग आढळल्याचे वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच ही बाब सुरक्षा विभागाला कळवली. सुरक्षा विभागातील सुरक्षारक्षक सुनील माळी हे साप व नाग पकडण्यात तरबेज असल्याने ही बाब त्यांना कळवण्यात आली. त्यांनी पुढील वीस ते पंचवीस मिनिटांत त्या नागाला योग्य प्रकारे पडकत सुरक्षित स्थळी सोडले.

या किंग कोब्राबद्दल माहिती देताना माळी म्हणाले, हा नाग सहा फुटी असून त्याचे वजन साधारण साडेचार किलो होते.सुनील माळी यांनी आतापर्यंत २०० हून अधिक साप व नाग पकडले आहेत.

अधिक वाचा  संकटकाळात पुरग्रस्तांसाठी पुण्याच्या Beyond Mounatins ट्रेकर्स ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी

दरम्यान माळी यांनी दाखवलेल्या या धडसाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, सुरक्षा विभागाचे संचालक सुरेश भोसले तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love