सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांच्या राजीनाम्याकरिता अभाविपचे बेमुदत उपोषण

पुणे-मुंबई शिक्षण
Spread the love

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ( Savitribai Phule Pune University) गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या अनेक गंभीर समस्या वेशीला टांगलेल्या आहेत. याविरोधात अभाविपने (abvp) सातत्याने वाचा फोडली. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता अकार्यक्षम परीक्षा संचालक (Exam Director) याकरिता जबाबदार असल्याचे दिसून आले. वारंवार परिक्षा संचालकांशी बोलूनही जर विद्यार्थ्यांच्या समस्या मार्गी लागत नसतील तर परिक्षा संचालक या विषयांवर जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे का? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उपस्थित होत आहे असा आरोप करत, अकार्यक्षम ठरलेल्या परिक्षा संचालकांनी तत्काळ आपला राजीनामा द्यावा, याकरिता अभाविप पुणे महानगरातील विद्यार्थी कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. (ABVP’s indefinite hunger strike)

आज पर्यंतच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहासात १०६ दिवसांचा कालावधी पार करून चुकीच्या पद्धतीने निकाल लागला. ‘मेकॅनिकल इंजीनियरिंग च्या ४ थ्या वर्षाच्या डायनामिक ऑफ मशीनरी या विषयाच्या पेपर मध्ये ९ वा प्रश्न दोन वेळेस आला आणि शेवटच्या १५ मिनीटांत प्रत बदलली गेली. कॉम्प्युटर  इंजिनियरिंगच्या सॉफ्टवेअर इंजिनियरिंग विषयाच्या परीक्षेत अभ्यासक्रमाच्या बाहेरील ७ प्रश्न विचारण्यात आले. परीक्षांच्या वेळापत्रकाचे पूर्व नियोजन नसल्यामुळे पुण्यातील पालखी दि १२ व १३ जून आणि आषाढी एकादशी व बकरी ईद १९ जून या दिवशीच्या परीक्षा आयत्या वेळेस पुढे ढकलण्यात आल्या.

अंतिम वर्षांचे निकाल न लागल्यामुळे फक्त सा.फु. पुणे विद्यापीठातील विद्यार्थी CET च्या प्रक्रियेत जाण्यापासून वंचित राहत आहेत. फोटोकॉपी ला अप्लाय केल्यानंतर १ महिन्यानी फोटोकॉपी मिळाली आणि रिव्हॅल्यूएशन चे निकाल मागील दिवसांपासून प्रलंबीत आहेत.

BPEd च्या परीक्षा होण्याआधीच फोटोकॉपी ची लिंक बंद झाली. अनेक कोर्स च्या विद्यार्थ्यांना अजून देखील फोटोकॉपी मिळाली नाही आणि फोटोकॉपी मिळण्याची प्रक्रिया देखील चालू नाही? रिव्हॅल्यूएशन चे निकाल लागण्याआधीच बॅकलॉग च्या परीक्षांना विद्यार्थ्यांना बसावे लागत आहे.

विद्यापीठाच्या वेबसाइटवर फक्त निकालाच्या लिंक आहेत परंतु त्यामध्ये कोणताही डेटा अपलोड केला नाही. अशा विविध गंभीर समस्या मागील काही महिन्यांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घोंगाळत आहेत.

अनेक अभ्यासक्रमांचे फोटोकॉपी प्रक्रिया सुरु नसुन ती तात्काळ सुरू करावी आणि ज्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीसाठी अर्ज केला त्यांना देण्यात यावी. ४५ दिवस होऊनही पुनर्मुल्यांकनाचे निकाल अद्याप लागले नाहीत ते निकाल तात्काळ व योग्य पद्धतीने लावावे. ज्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास देऊन आवश्यकता नसताना बॅकलॉगची परिक्षा देण्याची परिस्थिती निर्माण केली. अशा विद्यार्थ्यांची रक्कम परत करावी. मेकॅनिकल इंजिनियरींगच्या ४थ्या वर्षाच्या डायनॅमिक ऑफ मशिनरी या विषयातील चुकीच्या प्रश्नांचे पुर्ण गुण देण्यात यावे आणि कॅम्प्युटर इंजिनियरिंगच्या सॉफ्टवेअर इंजिनियरिंग विषयाच्या अभ्यास क्रमाच्या बाहेरील ७ प्रश्नांचे गुण विद्यार्थ्यांना देण्यात यावे. सर्व अभ्यासक्रमांचे निकाल पुढील ४५ दिवसांच्या आत लावण्याची दक्षता घ्यावी, अशा प्रमुख मागण्या अभाविपने केल्या आहेत.

अभाविपने या समस्या सोडविण्यासाठी वारंवार विद्यापीठात निवेदने दिले, वेळीच आंदोलनही केले परंतु कोणतीही सकारात्मक कृती विद्यापीठाने केली नाही. विद्यापीठाच्या या ढिसाळ कारभाराला जबाबदार असणाऱ्या व विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या अकार्यक्षम परिक्षा संचालकांनी तत्काळ राजीनामा द्यावा या मागणीला घेऊन अभाविप पुणे महानगरातील विद्यार्थी कार्यकर्त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे अशी माहिती अभाविप पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी दिली आहे.

ABVP’s indefinite hunger strike | Savitribai phule pune university | Exam Director

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *