पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांना आग: 30 वाहने जळून खाक


पुणे- पुण्यातील शिवाजीनगर भगत असलेल्या मॉडर्न कॉलेजच्या नजीक असलेल्या मोकळ्या जागेत पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेली चारचाकी, रिक्शा  आणि दुचाकी वाहने ठेवली जातात. अशा जप्त केलेल्या वाहने आज दुपारी या वाहनांना अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. दरम्यान, या आगीमध्ये जवळजवळ 30 वाहने जाळून खाक झाली आहेत. आगीचे कारण अद्याप समजू  शकले नाही.

अचानक या ठिकाणी असलेल्या वाहनांनी पेट घेतल्याचे समजताच आसपासच्या नागरिकांनी याबाबत पोलीस व अग्निशमन विभागास माहिती दिली. घटनास्थळाच्या आसपासचा परिसर हा रहिवासी परिसर असुन, पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात हा परिसर येतो. सुरूवातीस आगीचं रौद्ररुप पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

अधिक वाचा  येरवडा भागात एक अत्यंत संतापजनक अन् किळसवाणा प्रकार

दरम्यान, अग्नीशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर भागातील मॉर्डन कॉलेज जवळ असलेल्या मोकळ्या जागेत वाहतूक पोलिसानी ताब्यात घेतलेल्या दुचाकी, रिक्षा आणि चार चाकी वाहनांना आग लागल्याची माहिती पावणे चार वाजेत्या सुमारास आम्हाला मिळाली. त्यानंतर काही क्षणात अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी गाड्या दाखल झाल्या. घटनास्थळी जवळपास १०० हून अधिक गाड्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गाड्यांच नुकसान होण्याची शक्यता होती. हे लक्षात घेता पाण्याचा चारही बाजूने मारा केल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र तरी देखील दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी अशी एकुण ३० हून अधिक वाहनं आगीत जळून खाक झाली आहेत. ही आग कशामुळे लागली हे अद्याप सांगता येणार नाही असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love