10 वी -12 वीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर


पुणे -राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात १२ वी आणि माध्यामिक शालान्त प्रमाणपत्र अर्थात १० वी च्या लेखी परीक्षांचे याअगोदर जाहीर केलेले संभाव्य वेळापत्रक मंडळाने कायम केले असून त्याप्रमाणे या परीक्षा  एप्रिल-मे २०२१ मध्ये घेण्यात येणार आहेत. उच्च माध्यमिक म्हणजे १२ वीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच १० वीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या  कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

या परीक्षांचे  सविस्तर  वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर  उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

अधिक वाचा  अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन: महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे अभाविप बैठकीत दर्शन

यंदा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उदभवलेल्या परिस्थितीमुळे मंडळाच्या नेहमीच्या कालावधीमध्ये परीक्षा आयोजित न करता सरकारच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेतील लेखी परीक्षा एप्रिल-मे २०२१ मध्ये आयोजित करण्यात आली आहे, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येणार आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love