सिरम इन्स्टिट्यूटने केली भारतातील पहिली न्यूमोनियावरील लस विकसित: केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केले लोकार्पण

आरोग्य
Spread the love

पुणे-पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटने भारतात तयार करण्यात आलेली  पहिली न्यूमोनियावरील लस विकसित केली असून केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सोमवारी या लसीचे लोकार्पण केले, न्यूमोनियावरील ही पहिलीच भारतीय लस इतर दोन विदेशी लसी पेक्षा खूप स्वस्त असून पुढील आठवड्यात ही लस देशात विक्रीसाठी उपलब्ध होईल अशी माहिती सिरम कडून  देण्यात आली आहे

या न्यूमोकोकल पॉलीसॅक्राईड काँज्युगेट लसीचा उपयोग अर्भकामध्ये स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया विरोधात केला जातो. या लसीचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी व्हर्च्युअल कार्यक्रमाद्वारे लोकार्पण केले. यावेळी बोलताना हर्षवर्धन यांनी सिरम इन्स्टिट्यूटचे कौतुक केले, आज चा दिवस देशासाठी अत्यंत महत्वाचा आहे सिरम इन्स्टिट्यूट ने न्यूमोनियावरील ही लस विकसित केल्याने संपूर्ण भारतासाठी ही गर्वाची बाब असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन म्हणाले.

न्युमोनिया या श्वसन संबंधी आजारा मुळे भारतात दरवर्षी पाच वर्षा खालील एक लाख बालकांचा मृत्यू होतो असे युनिसेफ च्या आकडेवरून दिसून येते त्यामुळे भारतीय बनावटीची ही लस देशासाठी मोठे यश आहे. देशातील नाही तर जगभरातील विकसनशील तसेच अविकसित देशासाठी कमी किमतीत औषध पुरवण्याचे महत्वाचे कार्य सिरम इन्स्टिट्यूटने केले आहे असे सांगत आज आनंदाचा दिवस आहे सिरमला मिळालेले हे यश केवळ सिरम इन्स्टिट्यूटचेच नाही तर संपूर्ण देशातील सर्व शास्रज्ञांचे यश आहे असे केंद्रीय आरोग्य मंत्री यावेळी म्हणाले. कुठल्याही विषाणूशी लढण्याचे सामर्थ्य भारतीय संस्थांमध्ये आहे, भारत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही मार्ग काढू शकतो हे 2020 ने सिद्ध केले आहे असे देखील आरोग्यमंत्री म्हणाले.

आजचा हा गर्वाचा क्षण आहे देशा तील नागरिकांचे अभिनंदन न्यूमोनियामुळे देशातील बालकांचे निधन होत होते आता या लसी मुळे त्यांना आपण वाचवू शकू असे आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *