एमएचटी-सीईटी परीक्षेत 96.52 टक्के गुण मिळविणाऱ्या यश गालपेल्ली या विद्यार्थ्यावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी


पुणे- आपल्यासमोर असलेल्या सर्व आव्हानांवर मात करत एमएचटी-सीईटी परीक्षेत तब्बल 96.52 टक्के गुण मिळविणाऱ्या यश गालपेल्ली या विद्यार्थ्याचा सह्याद्री हॉस्पिटल्स तर्फे सत्कार करण्यात आला. 2018 मध्ये विल्सन डिसीज या गंभीर आजाराचे निदान झाल्यावर त्याच्यावर यकृत प्रत्यारोपण करण्यात आले होते. सह्याद्री हॉस्पिटल नगर रोड मध्ये जिवंत दात्याकडून यकृत मिळून प्रत्यारोपण झालेला यश हा पहिला लहान वयातील रुग्ण होता.

सह्याद्रि हॉस्पिटल्समधील हेपेटोबिलियरी व लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ.बिपिन विभुते म्हणाले की, यश आणि त्याच्या कुटुंबाने आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीकोन बाळगून,जिद्दीने ज्याप्रकारे सर्व आव्हानांवर मात केली, ते कौतुकास्पद आहे.खऱ्या अर्थाने यश ने त्याच्या नावाचा अर्थ सार्थ केला.

 इयत्ता दहावी मध्ये यशला 91 टक्के गुण मिळाले होते,त्यावेळी नव-नवी शिखरे गाठण्याची स्वप्ने तो पाहत होता. पण 2017 मध्ये गंभीर स्थिती उद्भवली. हातापायावर येणारी सतत सूज,नाकातून येणारे रक्त आणि डोळ्यात जळजळ होत होती.त्याला विल्सन रोग झाल्याचे निदान झाले होते.

अधिक वाचा  पुणे मनपातील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली अंशदायी सहाय्य योजना प्रशासनाने मोडीत काढू नये - गोपाळदादा तिवारी

 याप्रसंगी बोलताना यकृत प्रत्यारोपण तज्ञ डॉ.दिनेश झिरपे म्हणाले की, यशचे आई-वडील त्याला घेऊन आमच्याकडे जेव्हा आले होते,त्यावेळी त्याची तब्येेत खालावत चालल्याचे दिसत होते. नाकातून रक्त येणे,तोल जाणे,सांधेदुखी,पोटाला सूज येणे ही यकृताच्या रोगाची लक्षणे होती.आम्ही तत्काळ त्यावर चाचण्या केल्या आणि विल्सन रोग असल्याचे लक्षात आले. त्याच्यासाठी जिवंत दाता म्हणजे त्याची मावशी तयार झाली व त्यांचे यकृत जुळल्यावर त्याच्यावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली,जी तब्बल 10 तास चालली.यशचे वय आणि अन्य अवयव यांत गुंतले असल्यामुळे ही शस्त्रक्रिया जोखमीची होती.

 रूग्णाच्या कुटुंबाला हे उपचार परवडणासारखे नव्हते,त्यामुळे सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नगर रोड आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या मदतीने त्यांना उपचारासाठी आर्थिकदृष्ट्या सहायता करण्यात आली.मिशन मुस्कान अंतर्गत यश ला टाटा ट्रस्ट, ट्रान्सप्लांटस – हेल्प द पुअर फाऊंडेशन,मिलाप, पीएम फंड,रोटरी इंटरनॅशनल, ओसवाल बंधू समाज आणि प्रवीण अगरवाल फाऊंडेशनकडून देखील मदत मिळाली.त्यामुळे यशची शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत झाली.

अधिक वाचा  गुड न्यूज- मुंबईत दोन आठवड्यात तर राज्यात दोन महिन्यात कोरोना नियंत्रणात येणार?

  यश गालपेल्लीवर 2018 मध्ये यकृत प्रत्यारोपण करणार्या टीममध्ये यकृत प्रत्यारोपण तज्ञ डॉ.बिपीन विभूते,डॉ.दिनेश झिरपे,भूलतज्ञ डॉ.मनीष पाठक,डॉ.शीतल महाजनी,डॉ.स्नेहवर्धन पांडे,डॉ.अनिरूध्द भोसले,डॉ.मनोज राऊत,डॉ.अभिजित माने प्रत्यारोपण समन्वयक राहुल तांबे ,अरूण अशोकन आणि अमन बेले यांचा समावेश होता.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love