पुण्यामध्ये आज दिवसभरात कोरोनामुळे २३ जणांचा मृत्यू


पुणे- पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. आज दिवसभरात पुणे शहरात  नवीन ३२८ कोरोनबाधित रुग्णांची वाढ झाली तर दिवसभरात ३१६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आज दिवसभरात २३ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामध्ये ५ रूग्ण पुण्याबाहेरील आहेत.

सध्या ४९४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात २९० रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.पुण्यात आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १६२४१९ इतकी झाली असून ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ५६४१ इतकी आहे.आजपर्यंत एकूण मृत्यू ४२९३ झाले आहेत तर आजपर्यंतच एकूण १५२४८५ जण बारे होऊन घरी गेले आहेत.आज ३०५३ नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  ओॲसिस फर्टिलिटीतर्फे कृत्रिम प्रजनन तंत्र (एआरटी) कॉन्क्लेव्ह आयोजित आणि अनोखे अभियान ‘रिप्रोड्यूस’ सुरू