पुणे जिल्ह्यात ७५ आरोग्य कर्मचाऱ्यांवर कोरोना लसीची ‘ड्राय रन’

आरोग्य
Spread the love

पुणे(प्रतिनिधी)—पुणे शहर आणि जिल्ह्यातील तीन रुग्णालयात 75 आरोग्य कर्मचाऱ्यांवर कोविड लसीची ‘ड्राय रन’ घेण्यात आली. पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालय, पिंपरी-चिंचवड शहरातील जिजामाता रुग्णालय आणि मान येथील ग्रामीण रुग्णालयात आज सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान ही ड्राय रन पार पडली ही केवळ ‘ड्राय रन’ होती, अद्याप कोणत्याही व्यक्तीला कोविडची लस देण्यात आली नसल्याची माहिती डॉ.नितीन बिलोलीकर यांनी दिली.  

सिरम इन्स्टिट्युटच्या कोविड लसीला प्रशासनाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये कोविड ड्राय रन घेण्यात आली.ज्या कर्मचाऱ्यांवर ड्राय रन घेतली गेली त्या आरोग्य कर्मचाऱ्यांची जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच करोना लसीकरणासाठी तयार केलेल्या वेबसाईटवर नोंदणी केलेली होती. त्यांची मुलाखत घेण्यात आली, नंतर लसीकरण असलेल्या ठिकाणी बसवून त्यांची विचारपूस करत यात काय अडचणी येतात याविषयी आढावा घेण्यात आला आहे.

 दरम्यान, लस दिल्यानंतर त्या व्यक्तीला अर्धा तास डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया आज केवळ ड्राय रन म्हणून पार पडली आहे. अद्याप प्रत्यक्षात कोणालाही लस देण्यात आलेली नाही. तिन्ही केंद्रावर आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कोविड लस ड्राय रनचा आढावा

दरम्यान, मुळशी तालुक्यातील माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण मोहिमेला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट देऊन पाहाणी केली. तसेच कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून ड्राय-रन (रंगीत तालीम) ही घेण्यात आली. पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचे आतापर्यंत ३ लाख ६२ हजार ९७९ एवढे बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

कोविड १९ चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी भारतात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार कोविड-१९ लसीकरणाचे टप्पे आखण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात सर्व शासकीय व खाजगी आरोग्य संस्था अंतर्गत सर्व कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात वयोवृद्ध व कोमॉर्बिडीटी असणारे तर तिसरया टप्प्यात इतर सर्व सामान्य नागरिकांना लास उपलब्ध होणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *