gtag('js', new Date());
  • Home
  • पुणे-मुंबई
  • बदलत्या सकारात्मक विचारधारेचा युवा धोरणात समावेश परिवर्तन घडवेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बदलत्या सकारात्मक विचारधारेचा युवा धोरणात समावेश परिवर्तन घडवेल

बदलत्या सकारात्मक विचारधारेचा युवा धोरणात समावेश परिवर्तन घडवेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Spread the love

मुंबई : विकसित भारत २०४७ च्या दृष्टीने सुधारित युवा धोरणाची आखणी करावी. नव्या आव्हानांना सामोरे जाणाऱ्या युवकांच्या बदलत्या विचारसरणीचा समावेश युवा धोरणात केल्यास परिवर्तन शक्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

विधानभवन येथे राज्याच्या सुधारित युवा धोरणासाठी गठित समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे, आमदार अमोल मिटकरी, श्रीकांत भारतीय, राष्ट्रीय युवा पुरस्कार सन्मानर्थी प्रा. डॉ. मिलिंद भोई, शंतनू जगदाळे, तपस्वी गोंधळी, मनीष गवई, विशेष निमंत्रित सदस्य निवेदिता एकबोटे, आमदार संतोष दानवे, राजेश पवार, आशुतोष काळे, प्रवीण दटके, देवेंद्र कोठे, सुहास कांदे, डॉ. बाबासाहेब देशमुख, प्रकाश सुर्वे, वरुण सरदेसाई, रोहित पाटील, युवा बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शाह, क्रीडा व युवक कल्याण आयुक्त शीतल तेली  उपस्थित होते. विधान भवन मुंबई येथे ही बैठक संपन्न झाली.

अधिक वाचा  Pune Municipal Corporation Election : पुण्यात महायुती आणि दोन्ही राष्ट्रवादी या दोन्ही मोठ्या आघाड्यांमध्ये बिघाडी : चुरशीची आणि बहुरंगी लढत होण्याची शक्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, युवकांचे विचार, त्यांच्या अपेक्षा समजून घेत धोरण आखले गेले तर ते समर्पक ठरेल. शहरी व ग्रामीण भागातील युवकांना समान संधी मिळावी यासाठी प्रशिक्षण, सुविधा आणि योजनांचा समावेश असलेले समतोल धोरण तयार करणे आवश्यक आहे. युवक कल्याण विभागाबरोबरच अन्य विभागांनीही हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालये, सोशल मीडिया आणि सेवा क्षेत्रातील प्रतिनिधींनाही धोरणात सहभागी करून त्यांच्या सूचना समाविष्ट करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.  बैठकीत आमदार आणि निमंत्रित सदस्यांनीही सूचना मांडत समृद्ध धोरणासाठी योगदान दिले.

या समितीतील तज्ञ सदस्य प्रा. डॉ. मिलिंद भोई, डॉ. शंतनू जगदाळे, श्री प्रवीण निकम यांनी युवा धोरणामध्ये आवश्यक असलेल्या गोष्टींचा कच्चा मसुदा यावेळी माननीय मुख्यमंत्री यांना सादर केला.

अधिक वाचा  सॉलिडरीडाड एशिया आणि सीआरबी हवामान बदलाशी सामना करण्यासाठी रिजेनॅग्री कॉटन अलायंसची स्थापना करणार

शारीरिक मानसिक व भावनिक दृष्ट्या सक्षम असणारा युवक हा या युवा धोरणाचा पाया आहे असे प्रतिपादन प्रा. डॉ. मिलिंद भोई यांनी यावेळी केले.

शिक्षण, रोजगार, राष्ट्रप्रेमाला प्राधान्य

यावेळी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवित आहे. शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागातील युवकांच्या गरजा ओळखून, देश-विदेशातील युवकांबाबतच्या धोरणांचा अभ्यास करून, प्रत्यक्ष संवादातून उपाययोजना आखल्या जातील.

नवे सुधारित युवा धोरण यामध्ये शिक्षण, रोजगार, उद्योजकता, बौद्धिक व सामाजिक विकास, स्टार्टअप, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) याबरोबरच जबाबदारीची जाणीव, राष्ट्रप्रेम, नेतृत्वगुण रुजवणे यावर भर दिला जाणार आहे. यासाठी राज्य व जिल्हास्तरावरील योजना, युवा प्रशिक्षण केंद्र, युवा पुरस्कार, वसतीगृहे, महोत्सव, व्यक्तिमत्व विकास उपक्रम, युवा निधी आणि युवा प्रतिष्ठा निर्देशांक आदी बाबींचा समावेश केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

अधिक वाचा  राखी पौर्णिमेच्या दिवशीच बहिण- भावाचा वाद चव्हाट्यावर; मेव्हणे संजय काकडे आणि बहिण उषा काकडेंवर केला गुन्हा दाखल

.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Related Posts

Thalapathy Vijay TVK: तामिळनाडूच्या राजकारणात ‘थलपती’ वादळ; एका अपमानाचा असा घेतला बदला!

Spread the love

Spread the loveसुमारे १३ वर्षांपूर्वीची ती घटना आहे. तमिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एका अभिनेत्याचा असा काही अपमान केला की…


Spread the love
ByByNews24Pune May 12, 2026

पुण्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक; पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

Spread the love

Spread the loveपुणे(प्रतिनिधी)— राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर पुणे जिल्ह्यातील आळंदी म्हातोबा शनिवारी सकाळी…


Spread the love
ByByNews24Pune May 9, 2026

पुणे: अनधिकृत शाळांचा सुळसुळाट; पुणे महापालिकेकडून १३ ‘बोगस’ शाळांची यादी जाहीर : प्रवेश न घेण्याचे आवाहन

Spread the love

Spread the loveपुणे(प्रतिनिधी)-शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे शहरात अनधिकृत शाळांचा सुळसुळाट वाढला असून, पुणे महानगरपालिकेने यावर कठोर पाऊल…


Spread the love
ByByNews24Pune May 8, 2026

आरएमसी प्लांट शहराबाहेर हलवले जाणार नाही; पुणे आरएमसी असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय धुडकावला

Spread the love

Spread the loveपुणे(प्रतिनिधी)—पुणे शहरातील रेडिमिक्स कॉंक्रीट (आरएमसी) प्लांट येत्या सहा महिन्यात शहराच्या हद्दीबाहेर स्थलांतरित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची…


Spread the love
ByByNews24Pune May 8, 2026

बदलत्या सकारात्मक विचारधारेचा युवा धोरणात समावेश परिवर्तन घडवेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

by News24Pune time to read: <1 min
0