पुण्यातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय: महापौर


पुणे–: मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर त्यापाठोपाठ पुण्यातील शाळाही कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने 13 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पुणे महापालिका क्षेत्रातील खासगी आणि महापालिका शाळा बंद राहणार आहेत. 13 डिसेंबरला कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा उघडण्याबाबत निर्णय घेऊ, असं मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं आहे.  

दिवाळीनंतर पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागला आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये थंडीचं वातावरण पाहता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. याबाबत आरोग्य विभागाकडून आधीच माहिती देण्यात आली आहे. या लाटीला परतून लावण्यासाठी महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झालं आहे. आगामी संकट लक्षात घेऊन प्रशासनाने तयारी सुरु केली आहे.

अधिक वाचा  अजित पवारांना कोरोनाची लागण?काय म्हणाले पार्थ पवार?

दरम्यान, “शाळा सुरु करण्याचा निर्णय हा ऐच्छिक असेल. प्रत्येक जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करुन निर्णय घ्यावा”, अशा सूचना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत तर  “शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन आणि पालकांकडे सोडला आहे. शाळा सुरु केल्यामुळे आपल्या मुलाला बाधा होऊ शकते, असं पालकांना वाटत असेल तर शिक्षकांनी आधी पालकांशी चर्चा करुन याबाबत निर्णय घ्यावा”, असं उदय सामंत म्हणाले आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love