पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षेआधी होणार सराव परीक्षा:विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेचे तंत्र समजावून घेता येणार

शिक्षण
Spread the love

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या सत्र परीक्षा या १० एप्रिलपासून सुरु होणार असल्या तरीही त्याबाबतची सराव परीक्षा मात्र ५ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जाणाऱ्या मुख्य परीक्षेचा सराव करत त्याचे तंत्र समजावून घेता येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने सत्र परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही ऑनलाईन परीक्षा नेमकी कशी असेल याची तांत्रिक बाजू विद्यार्थ्यांना समजण्याच्या दृष्टिकोनातून सराव परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ५ ते ९ एप्रिल दरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ या वेळात ही सराव परीक्षा होणार आहे.

दरम्यान विद्यापीठाच्या पहिल्या सत्र परीक्षांचे वेळापत्रक टप्याटप्याने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येत आहे. ही परीक्षा संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार असून बहुपर्यायी स्वरूपात असणार आहे.

प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत इ मेल आयडीवर व मोबाईल क्रमांकवर माहिती देण्यात येईल.  sppuexam.in या संकेतस्थळावर  विद्यार्थ्यांना सूचना, युजर मॅन्युअल आणि व्हिडीओच्या माध्यमातून परिक्षेविषयी माहिती दिली आहे.तसेच विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास हेल्पलाईन ०२०- ७१५३०२०२ क्रमांकदेखील देण्यात आला आहे.

४८ तासांत कळणार स्कोअर..!

विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षा दिल्यानंतर युजर प्रोफाइलमध्येच त्यांना ४८ तासांत ऑनलाईन स्कोअर कळणार आहे. ज्याचे नंतर गुणांमध्ये रूपांतर केले जाणार आहे. याबाबत काही तक्रार असल्यास त्यांना ४८ तासांच्या आत नोंदवावी लागणार आहे, असेही परीक्षा विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *