विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग आत्मनिर्भरतेसाठी करावा- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी


पुणे- पदवीधर तरुणांनी निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून  सादाचाराने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी. त्यातूनच नवा भारत निर्माण होईल. यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय डोळ्यासमोर मेहनत, कष्ट, त्याग, इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प जोपासावा. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग आत्मनिर्भरतेसाठी करावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती प्रार्थना सभागृह आणि ग्रंथालय, राजबाग लोणी काळभोर येथे  ऑनलाईन पद्धतीने झालेल्या एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यीपीठाच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते. यावेळी इस्त्रोचे माजी संचालक पद्मभूषण डॉ. के. राधाकृष्णन, महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, माईर्स एमआयटी ग्रुपचे कार्याध्यक्ष राहुल कराड, दीपक शिकारपूर, एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, डॉ. सुचित्रा नागरे-कराड, डॉ. सुनील कराड, स्वाती चाटे-कराड, डॉ. सुनीता कराड, प्र-कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ . महेश देशपांडे, डॉ. जब्बार पटेल, परीक्षा विभागाचे प्रमुख श्री. ज्ञानदेव निलवर्ण यांच्यासह सर्व विभागाचे डीन, डायरेक्टर आणि विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.

विद्यापीठातर्फे 2019-20 या शैक्षणिक वर्षात पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील पदवी प्रमाणपत्रासाठी पात्र असलेल्या 1237 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. यात एमआयटी स्कूल ऑफ डिझाइनचे 350, एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचे 170, महाराष्ट्र अकॉडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन ॲन्ड ट्रेनी (एमआयटी मॅनेट) चा 266, एमआयटी स्कूल ऑफ फाईन आर्ट 22, एमआयटी आयएसबीजे 154, एमआयटी स्कूल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च 46, एमआयटी स्कूल ऑफ वैदिक सायन्स 12, एमआयटी फुड आणि टेक्नॉलॉजी 48, एमआयटी स्कूल ऑफ इंजीनिअरिंग 156, एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजीनिअरिंग सायन्स अँड रिसर्च 8 आणि एमआयटी संगीत कला अकादमीचे 2 अशा एकूण 1236 विद्यार्थ्यांनी पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठातर्फे 3 विद्यार्थ्यांना पी.एचडी पदवी प्रमाणपत्र आणि 22 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके ही प्रदान करण्यात आले.

अधिक वाचा  बाबासाहेब पुरंदरे उभी करत असलेली शिवसृष्टी सार्वकालिक आहे- राज्यपाल कोश्यारी

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, भारतीय विचार हा जागाला विश्वशांती संदेश देणार आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठ हे जागतिक स्तरावरील मुल्यात्मक शिक्षण देणारे विद्यापीठ म्हणून नावारुपाला येईल.  आम्हाला मातृभाषेचे ज्ञान असावे. आज आपण आर्टिफिशल इंटेलिजेशनच्या गोष्टी करतो, मात्र संत ज्ञानेश्वराचे तत्वज्ञ आणि वेद हे एआयाच खरा अर्थ सांगतात. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान आणि डिझाईन व अन्य कोणत्याही शाखेचे शिक्षण घेत असताना आध्यात्माचा अभ्यास ही करावे. आत्मनिर्भरतेचा विचार करत नवीन तंत्रज्ञानाचा आपल्या यशस्वी जीवनासाठी उपयोग करावा. आपण जे काम हाती घेता ते समर्पणाच्या भावनेतून प्रामाणिक हेतूने करावे. त्यासाठी इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प जोपासून आपले ध्येय साध्य करावे. नोकरीसाठी शिक्षण न घेता भविष्यात इतरांना नोकरी देणारे म्हणून पुढे यावे. विद्यार्थ्यांनी भारतात आणि भारतीयांसाठी आपल्या शिक्षणाचा वापर करावा.

अधिक वाचा  #Governor Ramesh Bais : भारताच्या परिवर्तनात युवा पिढीची महत्वाची भूमिका - राज्यपाल रमेश बैस

भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. याचा याोग्य उपयाोग करून भारताच्या विकासाला हातभार लावावा.

विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत डॉ. के. राधाकृष्णन म्हणाले, एमआयटी एडीटी विद्यापीठ एक व्हिजन घेऊन काम करत आहे. मुल्यात्मक आणि सर्वांगिण व्यक्तिमत्व विकास करणारे शिक्षण येथून दिले जाते. अध्यात्मिक संस्कृती जपत शिक्षणाचा वसा चालवला जात आहे. विद्यार्थ्यांनी आत्मिक चिंतन करत शिक्षणातून भविष्यातील नवी पिढी घडविण्यासाठी काम करावे. प्रत्येक पाच वषार्षात तंत्रज्ञानात बदल असते. तंत्रज्ञानाचा वापर समाजाच्या विकासासाठी व्हावा. आपल्यातील क्षमता ओळखून समाजाच्या विकासासाठी काम करावे. डिजिटलाईजेसन समाजाचे चित्र बदलले आहे. पारंपारिक पद्धतीसोबत आत्याधुनिक शिक्षण पद्धतीचा वापर करत काम करावे.   

अरुणभाई गुजराती म्हणाले,  एमआयटी हे जागतिक स्तरावरील विद्यापीठ निर्माण व्हावे. शिक्षण हे आपले व्यक्तिमत्व विकासासाठी महत्वाचे आहे. नवीन पिढीला संशेाधनात्मक काम करावे लागेल. आव्हानाला संधी म्हणून पाहवे आणि त्याला सत्यात उतविण्यासाठी सतत प्रयत्न करत रहावे. डिजिटल लर्निंग हे बदलत्या काळाची गरज आहे. आपण 21 व्या शतकात जगत असून सर्व बदल स्वीकारून विद्यार्थ्यांनी काम करावे. बदल हा महत्वाचा असून त्याला स्वीकारावा आणि बदलत्या काळात सतत चालत रहावे. गुणात्मक शिक्षण हे गुणात्मक जीवन प्रदान करत असते. गुणात्मक जीवन ही मानवतेसाठी अतिशय महत्वाचे आहे. किती ही संकट आले तरी आपले काम सतत चालू राहू द्यावे. श्वास, विश्वास आणि आत्मविश्वास हे यशस्वी जीवनाचे मुलमंत्र आहे.

अधिक वाचा  विद्यार्थ्यांनी सदाचाराचे व्रत अंगिकारताना जीवन मूल्यांसह जगातील आधुनिक तंत्रज्ञानही आत्मसात करावे- राज्यपाल कोश्यारी

डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, हिंदुत्व भारतीय एकात्मतेचे प्रतिक आहे. जागतिक शांततेसाठी तत्वज्ञ, शास्त्रज्ञ आणि संत यांनी केलेल्या कार्याचा विचार या घुमटामध्ये एकत्र आला. भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचा मेळ येथे घालण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वरांनी जगण्याचा अर्थ सांगितला आहे. माणसाने अतिशय प्रगती केली आहे. स्वामी विवेकानंद यांनी 1893 यांनी जगाला मानवता कल्याणाचा संदेश दिला. व्हालिस्टिक आणि शांतता प्रिय समाज निर्मितीसाठी एमआयटी एडीटी विद्यापीठ सतत काम करत आहे.

कुलगुरू डॉ. मंगेश कराड यांनी प्रस्तावना केले. प्रा. स्नेहा वाघटकर आणि प्रा. अशोक घुगे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अनंत चक्रदेव यांनी आभार प्रदर्शन केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love