पुणे- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल असला तरी अजूनही दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोरोनावरची लास कधी उपलब्ध होणार याकडे सारया जगाचे लक्ष लागले आहे. याबाबत दररोज काही न काही बातम्या आपल्याला ऐकायला मिळत आहेत. परंतु, आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) भारत यांनी आणखी एक टप्पा पूर्ण केल्याने आणखी एक दिलासा मिळाला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SSI) आणि आयसीएमआर, भारत यांनी सीरम इन्स्टिट्यूट तयार करत असलेल्या कोविशिल्ड (COVISHIELD) या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची नोंदणी पूर्ण झाल्याचे जाहीर केले आहे
दरम्यान, आयसीएमआर आणि एसआयआयने कोव्होवॅक्स (COVOVAX) या अमेरिकेतील नोव्हावाक्स (Novavax) कडून विकसित करण्यात येत असलेल्या लसीच्या क्लिनिकल डेव्हलपमेंटसाठी आपला सहयोग दिला आहे, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आली आहे.