हिंदुस्तान अँटिबायोटिक करणार आता आयुर्वेदिक औषधांचे उत्पादन


पुणे—गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या पिंपरी येथील प्रसिद्ध हिंदुस्तान अँटिबायोटिक (एचए) कंपनीने आयुर्वेदिक औषधांचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्तावही कंपनीने आयुष मंत्रालायला पाठवला आहे.

हिंदुस्तान अँटिबायोटिक (एचए) कंपनी गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणी आहे. कंपनीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.  कंपनीच्या मालकीची मोठी

आता आयुर्वेदिक औषध उत्पादन करणार आहे. पहिल्या हिंदुस्तान अँटिबायोटिक (एचए) कंपनी टप्प्यात प्रतिकारशक्ती आणि इतर काही आजारांवर उपयुक्त ठरणारी औषधे तयार केली जातील. कंपनीने तसा प्रस्ताव केंद्रीय आयुष मंत्रालयाला जमीन आहे. ती विकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही करत असतानाच कंपनीची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोरोंनाच्या काळात कंपनीने सॅनिटायझर आणि विविध आरोग्य चाचण्या करणारे यंत्र  तयार केले आहे. आता कंपनीने प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी आयुर्वेदिक गोळ्या तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतर काही आजारांवर देखील औषधांचे उत्पादन सुरू करण्यात येणं असून तसा प्रस्ताव आयुष मंत्रालयाला पाठविण्यात आला आहे. मंजूरी मिळाल्यानंतर त्वरित उत्पादनाला सुरुवात करण्यात येणार आहे. कंपनीला ही उत्पादने सुरू करण्यासाठी परवान्याची आवश्यकता आहे. परवाना मिळण्याच्या प्रक्रियेला साधारण एक महिना लागेल. त्यानंतर लगेचच ही उत्पादने सुरू करण्यात येतील असे सूत्रांनी सांगितले.

अधिक वाचा  कोरोनावरील एक औषध देणार तीन विषाणूंपासून संरक्षण? वैज्ञानिकांचा दावा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानवातील प्रतिकारशक्ति बळकट असणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे प्रतिकार शक्ति वाढविणाऱ्या गोळ्यांचे उत्पादन करण्याचा  निर्णय कंपनीने घेतला असून इतर आजरांवरील औषधे तयार करण्यात येणार आहेत. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love