पंतप्रधान मोदींची सीरम इन्स्टिट्यूटला भेट: घेतला लस विकासाचा आढावा

राष्ट्रीय
Spread the love

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (शनिवार) पुणे, गुजरात आणि हैदराबाद येथील कोरोनावरील लसीचे उत्पादन करीत असलेल्या कंपन्यांना भेटी दिल्या. या भेटीमध्ये त्यांनी संशोधकांचा कामाची प्रशंसा करत त्यांची पाठ थोपटली. मोदींनी गुजरात राज्यातील झायडस कंपनी, पुण्यातीस सीरम इन्स्टिट्यूट आणि हैदराबादेतील भारत बायोटेक कंपनीला मोदींनी भेट दिली. यावेळी त्यांनी लस विकासाची सर्व माहिती संशोधकांकडून जाणून घेतली. तसेच सरकारच्या सहकार्याचे आश्वासन दिले.

पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटला मोदींची भेटपंतप्रधान मोदी विशेष विमानाने आज दुपारी चार वाजता पुणे विमानतळावर पोहचले. तेथून हेलिकॉप्टरने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीते गेले. सायरस पुनावाला, अदर पुनावाला आणि नताशा पुनावाला यांनी मोदींचे स्वागत केले. तसेच पुनावाला यांच्यासह कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मोदींनी बैठक घेतली. अदर पुनावाला पंतप्रधान मोदींना कोरोनावर लस विकसीत करण्यात येत असलेल्या प्रयोगशाळेत घेऊन गेले. कोरोना लस विकासाचे काम कसे सुरू आहे याची सविस्तर माहिती पुनावाला यांनी पंतप्रधानांना दिली. कंपनीच्या संशोधकांनीही मोदींशी संवाद साधत लस निर्मितीवर चर्चा केली. त्यानंतर सुमारे सहा वाजता मोदी पुणे विमानतळावर पोहचले. तेथून विशेष विमानाने पंतप्रधान मोदी दिल्लीकडे रवाना झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, पुणे येथे भेट दिली आणि संस्थेमधील संशोधकांशी संवाद साधला. त्यांनी लस उत्पादन वाढीसाठी कशी योजना आखली आहे याविषयी आणि  आतापर्यंतच्या लशीच्या प्रगतीविषयी तपशील जाणून घेतला.

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथील टीमशी चांगला संवाद झाला. त्यांनी लसी उत्पादनात आणखी वाढ करण्याच्या दृष्टीकोनातून कशी प्रगती केली आहे याविषयी त्यांनी माहिती दिली. तसेच त्यांच्या उत्पादन सुविधेचा आढावाही घेतला.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *