सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीच्या वैद्यकीय चाचणीची (मानवी चाचणी) भारती हॉस्पिटलमध्ये सुरवात

आरोग्य
Spread the love

पुणे–कोरोनाच्या संकटाने सर्वांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. अशातच त्यावरील लस येणार या बातमीने आशेचा किरण निर्माण झाला आहे. बहुप्रतिक्षित पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीचे वैद्यकीय चाचणीची (मानवी चाचणी) सुरवात भारती विद्यापीठच्या भारती हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर येथे पहिल्या स्वयंसेवकास लस देऊन करण्यात आली.

भारती हॉस्पिटल येथे ऐकून ३५० स्वयंसेवकांना लस देण्यात येणार आहे. १८ वर्षावरील निरोगी स्त्री – पुरुष यांची यासाठी निवड करण्यात येणार आहे. स्वयंसेवकास निवडताना प्रथमतः त्यांची कोविड आर.टी.पीसीआर व अँटीबॉडी तपासणी करण्यात येणार आहे. या सर्व तापसण्या निगेटीव्ह असलेल्या स्वयंसेवकास लस देण्यात येणार आहे. अशा सुदृढ स्वयंसेवकास निवडण्यात येणार आहे.

या वैद्यकीय चाचणीसाठी भारती हॉस्पिटल व सिरम इन्स्टिट्यूट यांच्यामध्ये सहकार्य करार झालेला आहे. या संशोधनासाठी सिरम इन्स्टिट्यूट हे मुख्य प्रायोजक असून इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) हे सहप्रायोजक आहेत.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ब्रिटीश-स्वीडिश फार्मास्युटिकल कंपनी अ‍ॅस्ट्राजेनेका बरोबर करार केला आहे. ‘द लान्सेट’ या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार आतापर्यंत घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

 ब्रिटनने घेतलेल्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील चाचण्या प्रभावी ठरवल्यानंतर, दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील मानवी चाचण्यांना भारतातही परवानगी देण्यात आली आहे.  ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने 3 ऑगस्ट रोजी मानवी चाचणीसाठी देशातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला मान्यता दिली आहे.

कोविशिल्ड लस कधी उपलब्ध याबाबत काही दिवसांपूर्वी  ही लस 73 दिवसानंतर बाजारात उपलब्ध होईल, असे सांगितले जात होते.  परंतु नंतर कंपनीने स्पष्ट केले की हा केवळ अंदाज आहे.  सीरम संस्थेने असे म्हटले आहे की कंपनीला सरकारकडून लस तयार करण्याची परवानगी मिळाली आहे, परंतु ती भविष्यात वापरासाठी मिळाली आहे.  चाचणी यशस्वी झाल्यावरच आणि नियामक एजन्सीची मान्यता मिळाल्यानंतर लस बाजारात येईल  असे कंपनीने म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणी नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. जर चाचणीचा परिणाम चांगला मिळाले आणि लसीचे कोणतेही दुष्परिणाम दिसले नाही तर या लसीला  नियामक एजन्सीची मान्यता मिळेल आणि त्यानंतर ही लस लसीकरणासाठी उपलब्ध होईल. ही लस वर्षाच्या अखेरीस भारतीय बाजारात उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.

ही लस दिलेल्या स्वयंसेवकास पुढील सहा महिने निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

कोणत्याही स्वयंसेवकास यामध्ये सामील व्हायचे असल्यास 020-40 555 555  विस्तारीत क्रमांक 263   यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *