सिरमकडून चार कोटी कोविशिल्डच्या डोसची निर्मिती


पुणे – पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूटने कोरोनावर विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ covshield या लसीच्या तिसऱया टप्प्यातील मानवी चाचणी प्रक्रियेत भारतीय वैद्यकीय आयुर्विज्ञान परिषदेबरोबर (आयसीएमआर) भागिदारी केली आहे. तसेच नोवावॅक्स या कोरोनावर लस निर्मिती करणाऱया कंपनीकडून ‘कोवावॅक्स’ Kovavax या लसीची निर्मिती करण्यात येत असून, या चाचणी प्रक्रियेतदेखील सिरमने कंपनीशी भागिदारी केली आहे. दरम्यान, सिरमकडून चार कोटी कोविशिल्डच्या डोसची निर्मिती करण्यात आली आहे.

‘कोविशिल्ड’ची तिसऱया व अंतिम टप्प्यातील मानवी चाचणी देशातील 15 ठिकाणी होत आहे. यासाठी पुण्यासह देशभरातून 1600 स्वयंसेवकांनी 31 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी केली आहे. त्यांच्यावर ही चाचणी करण्यात येत आहे. या चाचणी प्रक्रियेसाठी येणारा खर्च ‘आयसीएमआर’कडून, तर ‘कोविशिल्ड’निर्मिती प्रक्रियेचा खर्च सिरम इन्स्टिटय़ूटकडून उचलण्यात येत आहे. याआधी सिरमने गावी आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनसोबतही गरीब देशांना लसीचे वितरण करण्यासाठी भागिदारी केली आहे. आयसीएमाआरसोबत भागिदारी म्हणजे खासगी आणि सरकारी संस्थांनी एकत्र येऊन कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घेतलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत सिरम इन्स्टिटटय़ूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी व्यक्त केले.

अधिक वाचा  ओऍसिस फर्टिलिटी या पुण्यातील पहिल्या प्रगत तंत्रज्ञान आधारित वंध्यत्व निवारण केंद्राचा शुभारंभ

 कोविशिल्ड आघाडीवर

सिरम इन्स्टिटय़ूटने केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाकडून आपत्कालीन लस निर्मिती करण्याचा परवाना घेतला आहे. त्याअंतर्गत सिरमने आतापर्यंत चार कोटी ‘कोविशिल्ड’च्या डोसची निर्मिती केली आहे. अ‍Ÿस्ट्रेझेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून आलेल्या फॉर्म्युल्यानुसार ही लस निर्मिती करण्यात येत आहे. या लसीची मानवी चाचणी परदेशातील युके, ब्राझील, दक्षिण अफ्रिका व यूएसएमध्ये मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. त्याचे निष्कर्षदेखील चांगले आहेत. कोविशिल्ड ही लस भारतात सर्वात आघाडीवर आहे, अशी माहिती सिरमच्या वतीने देण्यात आली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love