देशी गायींच्या सहवासाने कोरोनाला ठेवले दूर : राज्यातील तीनशे गोशाळेत पाहणीतील निष्कर्ष

आरोग्य पुणे-मुंबई
Spread the love

पुणे – कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नाही, असे ठिकाण सापडणे शक्य नाही. मात्र देशी गायींच्या सहवासात राहिल्याने कोरोनापासून दूर राहू शकतो असा अनुभव आला आहे. पुणे महानगर गोसेवा समितीच्यावतीने केलेल्या पाहणीत आश्चर्यजनक अनुभव आला आहे.

कोरोना काळात दैनंदिन देशी गायीच्या संपर्कात असणाऱ्या लोकांना कोरोनाची लागण झाली का, हे जाणून घेण्यासाठी पुणे महानगर गोसेवा समितीच्यावतीने राज्यातील ३०० गोशाळांमध्ये सर्व्हे केला आणि अत्यंत आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली समितीच्या कसबा भागाचे संयोजक गिरीष वैकर सांगत होते. ते म्हणाले, एकूण ३०० गोशाळांपैकी २९२ गोशाळांमध्ये काम करणाऱ्या एकालाही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नसल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे ही बहुतेक मंडळी विविध कामानिमित्त बाहेर येणे जाणे करत होती. गोशाळांच्या आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव होता. आठ गोशाळांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या एखाद-दुसऱ्या कामगाराला कोरोना झाल्याचे सांगितले.

या ३०० गोशाळांमध्ये दैनंदिन देशी गायीच्या संपर्कात असणाऱ्या एकूण १८९५ व्यक्ती होत्या. त्यापैकी १८८१ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली नसल्याचे लक्षात आले. देशी गायींच्या संपर्कात असलेल्या ९९.२७ टक्के व्यक्तींना कोरोनाची लागण झाली नसल्याचे सर्व्हेतून पुढे आल्याचे वैकर यांनी सांगितले.

सर्व्हे झालेले जिल्हे (कंसात गोशाळांची संख्या)

नगर – २७  

अकोला – ४

औरंगाबाद – ४

बीड – ४

बेळगाव – ४

बुलढाणा – ४

दापोली – १

धुळे – ३

जळगाव – ५

जालना – १

जुन्नर – १

कोल्हापूर – ३२

लातूर – ५

नांदेड – ३

नाशिक – १९

निजामपूर – १

पालघर – २

परभणी – २

पुणे – ६६

रायगड – ८

रत्नागिरी – १०

सांगली – २२

सिंधुदुर्ग – ९

सातारा – २६

सोलापूर – १४

सावंतवाडी – १

ठाणे – १

उस्मानाबाद – १

यवतमाळ – १

हैदराबाद – १

अन्य – १८

—-

देशात आणि परदेशात गोमुत्रावर मोठे संशोधन झाले आहे. आपल्या देशाला या संशोधनात देशी आणि अमेरिकन अशी सहा पेटंट मिळालेली आहेत. गोमूत्रामध्ये अँटिबायोटिक, अँटीफंगल, बायो एन्हान्सर, अँटी मायक्रोबायल, इम्यून एन्हान्सर, अँटिकॅन्सर या प्रॉपर्टीज असल्याचे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. गोशाळेत या लोकांचा दररोज गोमय आणि गोमुत्राशी येत संपर्क येतो. गोमूत्रामध्ये व्होलाटाइल ऑरगॅनिक आणि फेनॉलिक कंपाऊंड असल्यामुळे ते अँटीव्हायरल डीसइन्फेक्टन्ट कम सॅनिटायझर म्हणून काम करत असावीत. त्यामुळेच ९९ टक्क्यांपेक्षा जास्त मंडळी या कोविड इन्फेक्शन पासून दूर राहिल्याची शक्यता आहे.

– डॉ. प्रमोद मोघे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ (निवृत्त)

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे

—–

आमच्या भोसरी येथील गोशाळेत 1600 गोवंश असून त्यापैकी 90 टक्के देशी गायी आहेत. एकूण 40 महिला या ठिकाणी काम करतात. त्यापैकी कोणालाच कोरोनाची लागण झाली नाही. हा पंचगव्याचा परिणाम आहे, हे निश्चित.

– पुरुषोत्तम लढ्ढा

संचालक, पुणे पांजरापोळ

—–

देशी गायींच्या सहवासात असलेल्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे लक्षात आले. त्यासाठी 18 वेगेवेगळ्या प्रश्नावलीच्या माध्यमातून राज्यातील तीनशे गोशाळांमधून विस्तृत सर्व्हे करण्यात आला. बहुतांश लोकांनी कोरोनाचा त्रास झाला नसल्याचे सांगितले. त्याचे शास्त्रीत पातळीवरही परिणाम तपासण्यात आले.

निरंजन गोळे

सहसंयोजक, पुणे महानगर गोसेवा समिती (कसबा भाग)

—-

मी चार वर्षांपासून गोशाळेत काम करत आहे. देशी गाईच्या सहवासात राहिल्यानंतर मनाला प्रसन्नतेचा अनुभव येत आहे. कोरोनाकाळात तर आम्हाला गाईंच्या सहवासात खूप सुरक्षित वाटत आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढल्याचे मला जाणवले.

– किशोर शिंदे,

सोन शाम गो संवर्धन

कणकापूर (ता. देवळा, जि. नाशिक)

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *